ETV Bharat / state

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागा उध्वस्त, शेतकरी संकटात - satana

द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे संकटात सापडल्या आहेत. सटाणा तालुक्यातील बिजोटे व परिसरात काढणीस

द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे
author img

By

Published : Oct 23, 2019, 4:35 PM IST

नाशिक - द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे संकटात सापडल्या आहेत. सटाणा तालुक्यातील बिजोटे व परिसरात काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सटाणा तालुक्यातील बिजोटे व परिसरात काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

तेल्या रोगामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोठे कर्ज काढून व उसनवार पैसे घेऊन द्राक्ष बागा फुलविल्या आहेत. आर्थिक अडचण व नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत बहुतेक शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने अर्ली द्राक्ष घेतले. या पासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती. मात्र, अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तयार द्राक्ष काढणीवर असतानाच या बागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.

अशीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होणार आहे.

विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असतानाच अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलोऱ्यातील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर ऑक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्याने नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागांत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेली पावसाची रिमझिम सुरूच आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या पावसाने द्राक्ष पिके अडचणीत आले आहेत. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फ्लॉवरिंग, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत असल्याने या पावसाने बागांना धोका निर्माण झाला आहे. फ्लॉवरिंगमधील बागांमध्ये गळकुज दिसून येत आहे. बुरशीनाशकांची फवारणी तसेच डावणी रोगाला रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहेत. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु शुक्रवारपासून पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.

Intro:नाशिक /सटाणा
जयवंत खैरनार (10025)

# (सोबत व्हिडीओ, शेतकरी मुलखात व फोटो)

: द्राक्ष पंढरी आणि वाइन कॅपिटल अशी जगभर ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागा अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे संकटात सापडल्या आहेत.
सटाणा तालुक्यातील बिजोटे व परिसरात काढणीस आलेल्या द्राक्षांना तडे गेल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
Body:
तेल्या रोगामुळे डाळिंब बागा उध्वस्त झाल्याने अनेक शेतकरी द्राक्ष पिकाकडे वळले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी मोठे कर्ज काढून व उसनवार पैसे घेऊन द्राक्ष बागा फुलविल्या आहेत. आर्थिक अडचण व नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत बहुतेक शेतकऱ्यांनी मोठ्या हिंमतीने अर्ली द्राक्ष घेतले. या पासून मोठे आर्थिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा होती मात्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे तयार द्राक्ष काढणीवर असतांनाच या बागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
अशीच स्थिती संपूर्ण जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची आहे गेल्या तीन चार दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने द्राक्षबागांवर डावणी आणि भुरीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबरच्या प्रारंभी छाटलेल्या बागांचे घड जिरण्याचे अथवा कमकुवत येण्याची शक्यता असून, फुलोऱ्यातील द्राक्षबागांचेही या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होणार आहे.

विशेष काळजी घेऊन जोपासलेल्या द्राक्षबागांचे गेल्या महिन्यातील परतीच्या पावसामुळे नुकसान झालेले असतानाच अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे द्राक्ष पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. ढगाळ वातावरणामुळे प्रचंड आर्द्रता निर्माण झाली असून, नायट्रोजनचे प्रमाणही वाढले आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्षबागांना भुरीसह डावणी, करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी छाटणी झालेल्या द्राक्षबागा सध्या फुलोऱ्यात असून, अशा बागांना अचानक झालेल्या वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका बसला आहे. फुलोऱ्यातील बागांचे घड कमकुवत तयार होणे अथवा जिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर ऑक्टोबर छाटणीचा कालावधी सुरू असतानाच जिल्ह्यात ढगाळ वातावरण व पाऊस सुरू झाल्याने नव्याने छाटणी करण्यात आलेल्या बागांनाही रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतीत झाला आहे.
Conclusion:जिल्ह्यातील बहुतांश भागांत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेली पावसाची रिमझिम सुरूच आहे. ऐन दिवाळीत सुरू झालेल्या या पावसाने द्राक्ष पिके अडचणीत आले आहेत. सध्या द्राक्ष छाटणीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये छाटणी केलेल्या बागा आता फ्लॉवरिंग, फेलफुट, डिपिंग या अवस्थेत असल्याने या पावसाने बागांना धोका निर्माण झाला आहे. फ्लॉवरिंगमधील बागांमध्ये गळकुज दिसून येत आहे. बुरशीनाशकांची फवारणी तसेच डावणी रोगाला रोखण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागत आहेत. मागील काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते परंतु शुक्रवारपासून पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाल्याने द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.