ETV Bharat / state

नाशिकच्या बागलाण तालुक्यात आजोबा व नातवाचा मृत्यू, तर दोघे अत्यवस्थ; मृत्यूचे कारण अस्पष्ट - two deaths in Baglan taluka

बागलाण तालुक्यातील महड येथे दहा दिवसांपूर्वी शेतशिवारात एक कुटुंब वास्तव्यास आहे. दिवसभराची दिनचर्या आटोपून हे कुटुंब रात्रीची जेवणावळी आवरुन झोपण्यासाठी गेले. त्यात आजी, आजोबा, नातू अन्य एकजण पत्र्याच्या खोलीत कुलरच्या हवेत झोपले. यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला तर दोघे अत्यवस्थ आहेत.

आजोबा व नातवाचा मृत्यू
आजोबा व नातवाचा मृत्यू
author img

By

Published : Apr 28, 2022, 12:02 PM IST

नाशिक - बागलाण तालुक्यातील महड येथील एका घरातील आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला तर दोघे अत्यवस्थ आहेत. त्यांच्या मृत्यूचे कारण अजून समजू शकले नाही. मात्र ते झोपलेल्या खोलीतील कुलरजवळ किटकनाशक औषधीची बाटली खुली असलेल्या अवस्थेत आढळली आहे. त्यामुळे बाटलीतील द्रव कुलरच्या हवेमुळे पसरून त्यांचा मृत्यू झाला का? असा संशय व्यक्त केला जात आहे. आजोबा व नातवाच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी त्याचे नमूने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. तर आजी व अन्य एकाची प्रकृती गंभीर असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

हेही वाचा - Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळला

दोघे गंभीर - बागलाण तालुक्यातील महड येथे दहा दिवसांपूर्वी शेतशिवारात एक कुटुंब वास्तव्यास आहे. दिवसभराची दिनचर्या आटोपून हे कुटुंब रात्रीची जेवणावळी आवरुन झोपण्यासाठी गेले. त्यात आजी, आजोबा, नातू अन्य एकजण पत्र्याच्या खोलीत कुलरच्या हवेत झोपले. कुटुंबातील अन्य सदस्य घराबाहेर मोकळ्या हवेत झोपले होते. मात्र सकाळी खोलीत झोपलेल्या चौघांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान, चौघांना नेमके काय झाले? याचे कारण स्पष्ट होत नसल्यामुळे त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान नातू हरी सोनवणे (वय 12) याचा मृत्यू झाला तर आजोबा जिभाऊ सोनवणे (वय 65) यांचा पुणे येथील सैनिकी रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.यापैकी आजी व अन्य एकजण व्हेंटिलेटरवर नाशिक जिल्हा रुग्णालयात मृत्यूंशी झुंज देत आहेत.

या चौघांना काय झाले? - याचे कारण अद्याप स्पष्ट न झाल्याने वैद्यकीय पथकाने घटनास्थळी येवून सर्व संशयास्पद वस्तुंचे नमूने तपासून पाहिले आहेत. या तपासात रात्री जे कुलर सुरु करण्यात आले होते. त्या कुलरच्याजवळ शेतीपिकांवर फवारणी करावी लागणारी विषारी औषधे ठेवलेले आढळून आले आहेत. त्यामुळे कुलरची हवा त्यात किटकनाशकातून निघालेले द्रव व खोलीचा बंद असलेला दरवाजा यामुळे खोलीत नॅट्रोजनचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे या चौघांची प्रकृती बिघडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे, अशी माहिती बागलाण तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र अजून यावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.