नाशिक : Girl Missing Case In Nashik : नाशिक शहरात गेल्या आठ महिन्यात 173 अल्पवयीन मुली गायब (Girl Missing) झाल्याची धक्कादायक माहिती समोर (Nashik Crime News) आलीय. मात्र 149 मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. बेपत्ता असलेल्या आणखी 24 मुलींचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
आठ महिन्यात अनेक मुली गायब : नाशिक शहरातून दररोज एक तरी मुलगी बेपत्ता (Girl Missing Case In Nashik ) झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात (Nashik Police Station) दाखल होते. राहत्या घरातून मुलीला कोणीतरी फूस लावून किंवा तिचं अपहरण केल्याचं तक्रारीत म्हटलं जातं. बहुतांश मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांना अपहरणाचा गुन्हा दाखल करावा लागतो. नाशिक शहरात आठ महिन्यात 173 अल्पवयीन मुली तर 43 मुलं गायब झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
'या' कारणामुळे मुली गायब : 149 मुली आणि 41 मुलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. अल्पवयीन मुलं, मुलींचं बेपत्ता होण्यामागे अपहरण हेच एकमेव कारण नाही. काही मुली वेगवेगळ्या कारणामुळे घरात कुणाला न सांगता घरातून निघून जातात. गायब होणाऱ्या मुला-मुलींचा वयोगट हा 15 ते 17 वर्ष असा आहे. 2022 मध्ये 57 मुलं आणि 265 मुली बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यातील 54 मुलं आणि 250 मुलींना शोधण्यास पोलिसांना यश आलं आहे.
किशोरवयीन अवस्थेमध्ये हार्मोन्स चेंजमुळे मुला-मुलींना अपोजिट सेक्स बद्दल आकर्षण वाटतं. अशात इंटरनेट, सोशल मीडिया याचा देखील परिणाम होतोय. गेल्या काही काळात विभक्त कुटुंब पद्धतीचं प्रमाण वाढलं आहे. आई-वडील दोघंही नोकरी करत असल्याने मुलांशी संवाद राहिला नाही. त्यामुळे मुली भावनिक आधार मिळावा यासाठी कमी वयात प्रेम प्रकरणात ओढल्या जातात. पालकांनी किशोरवयात येण्याअगोदरची दोन वर्ष आणि नंतरची दोन वर्ष मुलींची काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. अशात त्यांना समजून घेणे, त्यांचं म्हणणं ऐकून घेणे त्यावर योग्य मार्गदर्शन करणे गरजेचं आहे. तसेच स्मार्टफोनदेखील मुलींना ठराविक वेळेपूर्वी मिळू नये, याचीही काळजी पालकांनी घेणं गरजेचं आहे. डॉ हेमंत सोननीस, मानसोपचार तज्ज्ञ
यांच्याकडून घेतला जातो शोध : मध्यवर्ती गुन्हे शाखेसह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेतला जातो. तसेच निर्भया पथकामार्फत सुद्धा दाखल गुन्ह्यांचा तपास केला जातो. स्थानिक पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक देखील अशा बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेत असतात.
हेही वाचा -