ETV Bharat / state

Nashik Leopard Attack : त्र्यंबकेश्वरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू - Girl Died in Leopard Attack in Nashik District

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे घुमोडी या गावातील एका घरा बाहेर रुचिता एकनाथ वाघ ही आठ वर्षाची बालिका खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यांने अचानक तिच्यावर हल्ला केला. यात तिचा मृत्यू झाला. ( Girl Died in Leopard Attack in Nashik District )

Nashik Leopard Attack
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय बालिकेचा मृत्यू
author img

By

Published : Jul 5, 2022, 7:49 PM IST

नाशिक - त्र्यंबकेश्वर तालुक्यातील घुमोडी येथे सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एका आठ वर्षे चिमुकलीचा मृत्यू झाला ( Girl Died in Leopard Attack in Nashik District ). या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तात्काळ पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे घुमोडी या गावातील एका घरा बाहेर रुचिता एकनाथ वाघ ही आठ वर्षाची बालिका खेळत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यांने अचानक तिच्यावर हल्ला केला. रुचिता सापडत नसल्याने घरचांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावात सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ती सापडली नसल्याने बिबट्याच्या हल्ल्याचा संशय आला. त्यानंतर घरच्यांनी ग्रामस्थांनी आजूबाजूच्या शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री दहाच्या सुमारास तिचा मयत गावापासून एक किलोमीटर दूर झुडपामध्ये आढळला, अशी माहिती वनपरिक्षेत्रक अधिकारी विवेक भदाने यांनी ही माहिती दिली.

बिबट्याचे हॉटस्पॉट - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. यासोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

अशी घ्यावी काळजी - नाशिक जिल्ह्यात उसाचे क्षेत्र मोठे बिबट्यांना लपण्यासाठी ही चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबट्यांचे हल्ले होत असल्याचे दिसून आले आहे. अशात शेतकऱ्यांनी मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन प्राणी जवळ येणार नाहीत. अनेक वेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आव्हान वन विभागाने केले आहे.

हेही वाचा - Gajanan Maharaj Palkhi : वैष्णव पताका हाती घेऊन संत गजानन महाराज पालखी विठ्ठल भेटीला रवाना; सोलापुरात भव्य स्वागत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.