ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : कारागृहातील बंदिवानांनी साकारल्या नयनरम्य गणेशमूर्ती घरोघरी स्थापन - बंदिवानांनी साकारल्या नयनरम्य गणेशमूर्ती

Ganeshotsav २०२३ : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात (Nashik Road Central Jail) बंदिवानांनी शाडूमातीपासून पर्यावरणपूरक साकारलेल्या गणेश मूर्तींची (Eco Friendly Ganesh) विक्री सुरू आहे. सुबक कलाकुसर गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नाशिककर गर्दी करत आहेत.

Ganeshotsav २०२३
बंदिवानांनी बनवलेल्या पर्यावरण पूरक गणेश
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 19, 2023, 8:16 AM IST

शाडूमातीपासून साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

नाशिक : Ganeshotsav २०२३ : नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील (Nashik Road Central Jail) बंदिवानांनी शाडूमातीपासून साकारलेल्या गणेशमूर्तींची विक्री सुरू करण्यात आली आहे. आकर्षक, सुबक असलेल्या या गणेश मूर्ती खरेदीला नागरिक चांगला प्रतिसाद देत आहेत. तर शेकडो मूर्त्यांची बुकिंग झाली आहे.

कैद्यांनी बनवलेल्या गणेश मूर्ती : गणेशोत्सवाचे (Ganesh Chaturthi 2023) भाविकांना वेध लागले आहे. यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यासाठीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी आपल्या हातानी सुबक बाप्पाच्या पर्यावरणपूरक मूर्ती (Eco Friendly Ganesh) साकारल्या आहेत. त्या विक्रीसाठी उपलब्ध करण्यात (Sale Center of Ganesha Idols) आल्या आहेत. यंदा 720 मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या मुर्त्यांचा समावेश असल्याने नाशिककर खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

कारागृहाबाहेर भाविकांची गर्दी : नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) बंदिवानांकडून अनेक कलाकुसरीची कामे केली जातात. यात शेतीकाम, विणकाम, सुतारकाम याचा समावेश आहे. आज बाप्पाचे आगमन होणार आहे. याच पार्श्वभूमीवर कारागृहातील बंदीवानांनी मागील आठ महिन्यापासून आपल्या हाताने शाडू मातीपासून सुबक आकर्षक बाप्पा घडविले आहेत. सध्या गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी नाशिकच्या भाविकांनी कारागृहाबाहेरील विक्री केंद्रावर गर्दी केली आहे.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती : मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांनी निसर्गाला पोषक अशा मूर्ती शाडूच्या मातीपासून तयार केल्या आहेत. या मूर्ती खरेदीसाठी दरवर्षी कारागृहाच्या विक्री केंद्रावर भाविक गर्दी करत असतात. दरम्यान बंदीवानांनी यंदाही पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यास प्राधान्य दिले आहे. या मूर्तीना रंगविण्यासाठी नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो. इकोफ्रेंडली गणपती तयार करताना शाडू माती, कागद, टिश्यूपेपर, वॉटरकलर, भाज्यांपासून तयार केलेले रंग, डिंकापासून बनविलेला गम, कापड इत्यादी साहित्याचा वापर करण्यात आला आहे. यावर्षी देखील हे दालन पुन्हा उघडले असून जवळपास सर्वच मूर्ती बुक झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितलं आहे.

गणेशमूर्तीचा समावेश : बंदिवानांनी तयार केलेल्या मूर्ती विक्री केंद्राला 'प्रगती' असं नाव (Pragati Ganesh Idol Sales Centre) देण्यात आले आहे. या विक्री केंद्रावर सर्वात लहान 10 इंच मूर्ती असून सर्वात मोठी 30 इंच मूर्ती आहे. यात फेटा गणेश मूर्ती, वक्रतुंड गणेश मूर्ती, लंबोदर गणेश मूर्ती, दगडूशेठ गांधी गणेश मूर्ती, लालबाग गणेश मूर्ती, त्रिमुखी गणेश मूर्ती, जास्वंद गणेश मूर्ती, मोरावर विराजमान गणेश मूर्ती त्याचप्रमाणे लहान कमळ, वक्रतुंड, मोठा वक्रतुंड, गजमुख लंबोदर आदी प्रकारच्या गणेशमूर्ती कारागृहात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या मूर्तींची किंमत 800 रुपयांपासून 5500 रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे सध्या कारागृहाच्या विक्री केंद्रावर भाविक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करत आहेत.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav Muhurta २०२३ : गणेशाच्या स्थापनेसाठी कधी आहे मुहूर्त; पाहा व्हिडिओ
  2. Richest Ganpati in Mumbai : काय सांगता! 69 किलो सोन्यासह 336 किलो चांदीनं बनली 'या' बाप्पाची मूर्ती
  3. Ganeshotsav २०२३ : राज्यभरात गणेशोत्सवाचा जल्लोष; सकाळी पार पडली मुंबईच्या सिद्धिविनायकाची आरती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.