नाशिक (मनमाड) - मनमाड रेल्वे स्थानकावर तरुणाची हत्त्या करून फरार झालेल्या 4 आरोपींना लोहमार्ग रेल्वे पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले आहे. रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून या आरोपींना अटक करण्यात आली आहे. 6 नोव्हेंबर रोजी शिवम पवार या तरुणांची हत्त्या करण्यात आली होती. प्रेम प्रकरण आणि सोशल मीडियावर अश्लील फोटो अपलोड करण्याच्या प्रकरणातून हत्या करून हे चारही आरोपी फरार झाले होते. तीन दिवस तळ ठोकून असलेल्या पोलीस पथकाने अगदी शिताफीने या चारही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अखेर त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून अटक
सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर अश्लिल फोटो अपलोड करण्याच्या वादातून 6 नोव्हेंबर रोजी ऐन भाऊबीजेच्या दिवशी मनमाड रेल्वे स्थानकावर चार तरुणांच्या टोळक्याने उसवड तालुका चांदवड येथील शिवम पवार याचा धारदार शस्राने निर्घृण खून करून पलायन केले होते. त्यानंतर पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ येथून अटक करण्यात आली. चेतन मोधळे, मयुर कराळे, निशांत जमधाडे, मोहित सुकेजा अशी या चार संशयितांची नाव आहेत. त्यांना आज मनमाड न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लोहमार्ग जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, महेंद्र पाटील, संतोष भालेराव, प्रमोद जाधव, सागर पेठे, आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.
सोशल मीडियावर प्रेम त्यातून वाद व खुन
शिवम व या चारही आरोपींमध्ये सोशल मीडियावर अश्लिल फोटो अपलोड करण्यावरून वाद होता. मात्र, शिवम व ज्या मुलीचे प्रेम होते त्यावरून खरा वाद होता असा धक्कादायक प्रकार समोर येत आला आहे. गेल्या अडीच वर्षांपासून शिवम व त्याच्या मैत्रिणीचे सोशल मीडियावर प्रेम सबंध जुळले होते. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यात वाद व्हायला लागला. त्यामध्ये मुलीच्या मित्रांचा समावेश आल्यानंतर ही खुनाची घटना घडली आहे.
लोहमार्ग पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी रात्री पोलिसांकडे फक्त संशयित आरोपींचे नाव होते. मात्र, लोहमार्ग पोलिसांनी त्या मुलीला विश्वासात घेऊन सर्वांचे पत्ते शोधून काढले आहेत. मात्र, हे चारही घरी नव्हते. मग त्यांना ट्रॅप करत अखेर रायगड येथील नेरळ येथे रेल्वे गेट वरून ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा - सातारा जिल्हा बँक निवडणूक : कराड, पाटणमध्ये चुरशीची लढाई, सहकार मंत्री, गृहराज्यमंत्री रिंगणात