ETV Bharat / state

Fake Baba in Nashik : जादूटोणा झाल्याची थाप मारून आईसह मुलींवर वारंवार बलात्कार; भोंदूबाबाला भावासह अटक - जादुटोणा बलात्कार घटना

मुलीचे लग्न जमत नसल्याने पीडित महिला येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे ( Fake baba in Nagade village ) गेली होती. बाबाने मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत जाळ्यात ओढले. आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. तसेच वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत आईसह मुलींचा व्हिडीओ काढून अत्याचार ( physical abuse with knife fear ) केले.

आरोपी
आरोपी
author img

By

Published : Feb 24, 2022, 5:41 PM IST

Updated : Feb 24, 2022, 5:50 PM IST

नाशिक - महिलेला तुमच्या मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत येवला परिसरात राहणाऱ्या भाेंदूबाबासह त्याच्या भावाने फसविले आहे. दोघांनी आईसह तिच्या तिन्ही मुलींवर सलग दोन वर्षांपासून बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला ( physical abuse by witchcraft fear ) आहे. आरोपीवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी भोंदूबाबा व त्याच्या भावाला अटक केली ( Bhondu baba arrested with brother ) आहे.

मुलीचे लग्न जमत नसल्याने पीडित महिला येवला तालुक्यातील नागडे गावातील एका बाबाकडे ( Fake baba in Nagade village ) गेली होती. बाबाने मुलीला जादूटोणा झाल्याचे सांगत जाळ्यात ओढले. आईसह तिन्ही मुलींना पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले. तसेच वेळोवेळी चाकूचा धाक दाखवत आईसह मुलींचा व्हिडीओ काढून अत्याचार ( physical abuse with knife fear ) केले. सुफी अजीज अब्दुल बाबा व जब्बार शेख अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी तब्बल २ वर्षे ४ महिने वेळोवेळी पीडित आई व तिच्या तिन्ही मुलींना ब्लॅकमेल करत पैशाची मागणी केली.

कुणाची फसवणूक झाली असेल तर तक्रार करावी

हेही वाचा-गोंदिया शहरात गँगवॉरमध्ये एकाची हत्या, तर एक जखमी, सर्व आरोपी फरार

भोंदूबाबाने केलेल्या कृत्याबद्दल उलटसुलट चर्चा

या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येवला शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तपास करत आहेत. दरम्यान या घटनेनंतर संपूर्ण येवला शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. भोंदूबाबाने केलेल्या या कृत्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भोंदूबाबाच्या तपासात आणखी काय समोर येते, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

हेही वाचा-Murder For Ransom Gondia : गोंदियात १० लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाची हत्या..
तक्रारदारांनी पुढे यावे
पाेलीस अधिक्षक सचिन पाटील म्हणाले, की जादूटाेणा झाल्याचे सांगून व लाेकांच्या भाेळ्या श्रद्धेचा फायदा घेऊन दाेघांनी हे कुकर्म केल्याचे समाेर येत आहे. आरोपींनी ब्लॅकमेल करून आठ लाख रुपये उकळले, असेही तक्रारीत म्हटले आहे. त्याचा तपास केला जात आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाेघांनाही अटक करण्यात आली आहे. अशाच प्रकारे कुणाची फसवणूक व अत्याचार झाले असतील तर पाेलिसांकडे तक्रार करावी. नाव गुप्त ठेवले जाईल, असेही पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले आहे.

हेही वाचा-Girl killed in one side love : एकतर्फी प्रेमातून अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची हातोड्याने निर्घृण हत्या; ब्लेडने आत्महत्येचा आरोपीचा प्रयत्न

Last Updated : Feb 24, 2022, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.