ETV Bharat / state

देशातील पहिला टायरबेस मेट्रो बससेवा प्रकल्प नाशिकमध्ये होणार सुरू - maharashtra goverment

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्यावतीने टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येत असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे.

टायरबेस मेट्रो बससेवा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू होणार
author img

By

Published : Jul 23, 2019, 2:36 PM IST

Updated : Jul 23, 2019, 3:14 PM IST

नाशिक- मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता नाशिककरांनाही मेट्रो सेवा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिक मेट्रो बससेवेच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्यावतीने टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येत असून, चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य शासनाला प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिली.

टायरबेस मेट्रो बससेवा प्रकल्प नाशिकमध्ये सुरू होणार
एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच होणार आहे. यावेळी दिक्षित म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प नाशिक मध्ये साकारला जाणार असून, यात नाशिक महापालिकेचा सहभाग कमीत कमी राहणार आहे.

प्रकल्पाची वैशिष्ठ्ये:
1) वातानुकूलित, विजेवर चालणारे कोच
2) जवळपास ३०० प्रवासी क्षमता
3) टायर रबरी असणार
4) स्वयंचलित दरवाजे ,आरामदायी आसन व्यवस्था,
5) बस स्थानकावर सरकते जिने, लिफ्टची सोय
6) बसेस मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होतील
7) स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज नाही.

या प्रकल्पासाठी १८०० ते २००० कोटींचा खर्च अपेक्षित असुन हा खर्च केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. त्यात ६० टक्के रक्कम कर्जातून उभी केली जाईल तर, ४० टक्के केंद्र आणि राज्य सरकार ५०-५० टक्के खर्चाचा भार इक्विटीच्या माध्यमातून उचलणार आहे, असेही दिक्षित यांनी सांगितले.

एकुण 32 किलोमीटरचा मार्ग:
नाशिकमध्ये गंगापूर ते नाशिक महामार्ग रोड व्हाया सीबीएस आणि गंगापूर ते नाशिकरोड अशा पद्धतीचे दोन मार्ग असतील. याठिकाणी पोहोचण्यासाठी दोन फीडर मार्ग असणार आहेत. नाशिकची भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन ही किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा असेल असेही ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच महा मेट्रोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Intro: मुंबई, पुणे आणि नागपूरनंतर आता नाशिककरांनाही मेट्रो सेवा मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच नाशिक मेट्रो सेवेच्या कामाचा शुभारंभ करण्याच्या हालचालीही सुरु झाल्या आहेत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महा मेट्रोच्यावतीने टायरबेस मेट्रो बसप्रकल्प साकारण्यात येत असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. त्यासाठी लवकरच राज्य शासनाला प्रकल्प अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी नाशिक येथील पत्रकार परिषदेत दिलीBody:एलिव्हटेड कॉरिडॉरच्या माध्यमातून देशात अशा प्रकारचा प्रकल्प प्रथमच असणार आहे.या वेळी दिक्षित म्हणाले की हा प्रकल्प नाशिक मध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प साकारला जाणार असून नाशिक महापालिकेचा सहभाग कमीत कमी राहनार आहे
1)वातानुकूलित विजेवर चालणारे कोच
2)जवळपास 300प्रवासी क्षमता
3)टायर लोखडी नाही तर रबरी असनार
4)स्वयंचलित दरवाजे ,,आरामदायी आसन ,
5)बस स्थानकावर सरकते जिने,लिफ्टची व्यवस्था
6)बसेस मुख्य काँरिडाँरवरून जाताना चार्ज होतील
7)स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेचि गरज नही Conclusion:या प्रकल्पासाठी 1800 ते 2000 कोटींचा खर्च अपेक्षित असुन हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून केला जानार आहे त्यात 60 टक्के रक्कम कर्जातून उभी केली जाईल तर 40 टक्के केंद्र आणि राज्य सरकार 50-50 टक्के खर्चाचा भार इक्विटीच्या माध्यमातून उचलणार आहे, असेही दीक्षित यांनी सांगितलं
*एकुण 32 कीलोमिटरचा मागं:-
नाशिकमध्ये गंगापूर ते सीबीएस ते महामार्ग आणि गंगापूर ते नाशिकरोड अशा पद्धतीचे दोन मार्ग असतील. याठिकाणी पोहोचण्यासाठी दोन फीडर मार्ग असणार आहेत. नाशिकची भविष्यकालीन गरज लक्षात घेऊन ही किफायतशीर आणि पर्यावरण स्नेहीसेवा असेल असेही ते म्हणाले. यावेळी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे तसेच महा मेट्रोचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

बाईट.1)मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित
बाईट.2) म.न.पा.आयुक्त राधाकृष्ण गंमे
MH_nsk_byte.1.Nashik Metro.mp4

MH_nsk_byte.2.Nashik Metro.mp4

MH_nsk_Vil.Nashik Metro.mp4
Last Updated : Jul 23, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.