ETV Bharat / state

सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार

author img

By

Published : Sep 29, 2019, 9:22 PM IST

केंद्र सरकारने रविवारी कांदा निर्यात बंदीचा घेतलेल्या निर्णयावर शेतकरी वर्गातून प्रचंड असंतोष व्यक्त केला जात आहे. सरकारने हा निर्णय घेताना दिलेली कारणे चुकीची असल्याचे शेती जाणकार आणि नेते गणित मांडून स्पष्ट करत आहेत.

लासलगाव कांदा

नाशिक - कांद्याचे भाव नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने रविवारी कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणण्याचा निर्णय जाहिर केला आहे. तर साठेबाजीला आळा घालण्यासाठी काही मर्यादा घातल्या आहेत. यावर लासलगाव बाजार समितीचे सभापती जंयदत्त क्षिरसागर यांनी कांद्याचे भाव कोसळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाने कांद्याचे भाव कोसळणार

हेही वाचा - कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारचे मोठे निर्णय...

महाराष्ट्रासह अनेक राज्यात पूरपरिस्थितीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यात खरिपातील कांदा अजून बाजारात न आल्याने कांद्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निणर्य घेतल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. या निर्णयाचा ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.

शहरी भागात कांद्याचा दर ६० रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. गेल्या एक महिन्यांपासून कांदा दरामध्ये दररोज वाढ होत आहे. शनिवारी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलाव झाले. तेव्हा उन्हाळी कांद्याला किमान ११०० रुपये क्वींटल तर कमाल ३६०० रुपये क्वींटल दर होते. कांदा दरावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये दोनदा शिष्टमंडळ पाठवून बाजारभाव वाढीबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता.

हेही वाचा - आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या FIR मध्ये शरद पवारांचे नावच नाही !

Intro:केंद्रसरकारने सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळतील अशी शक्यता लासलगाव बाजार समितीचे सभापती जंयदत्त क्षिरसागर यानी व्यक्त केलीय..Body:महाराष्ट्रासह अनेक राज्यात पूरपरिस्थितीमुळे कांदा उत्पादनावर परिणाम झाला असुन त्यात खरिपातील कांदा अजून बाजार न आल्याने कांद्याच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असून, दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निणर्य घेतला आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. या निर्णयाचा ऐन सणासुदीच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.Conclusion:शहरी भागात कांद्याच्या दराने साठी ओलांडली आहे. गेल्या एक महिन्यांपासून कांदा दरामध्ये दररोज वाढ होत आहे. शनिवारी लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार
समितीच्या लिलाव झाले. तेव्हा उन्हाळ कांद्याला
कमीत कमी 1100सरासरी 3600 जास्तीत जास्त
3880 रुपये भाव मिळाले होते. कांदा दरावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने
लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये दोनदा शिष्टमंडळ पाठवून बाजारभाव वाढीबाबतचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीवर होऊ शकतो परिणाम
विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.