ETV Bharat / state

Car fire Nashik : सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला आग..

नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर सप्तशृंगी देवीच्या ( Saptshringi Devi ) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला आग (Car fire in Nashik) लागली. गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने जीवित हानी टळली.

Car fire Nashik
गाडीला आग
author img

By

Published : Dec 27, 2022, 8:41 PM IST

सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला आग

नाशिक : शहरातील दिंडोरी रस्त्यावर गाडीला आग (Car fire in Nashik) लागल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या दिंडोरी रस्त्यावर सप्तशृंगी देवीच्या (Saptshringi Devi) दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला आग लागल्याने गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली. नाशिकहून वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ ही घटना घडली. या घटनेत कार पुर्णतः जळून खाक झाली. सुदैवाने जीवित हानी झालेली नाही.

चालकाच्या लक्षात आल्याने अनर्थ टळला : नाशिकहून दिंडोरीमार्गे एक कुटुंब कारने वणी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जात होते. गाडी वनारवाडी फाट्याजवळ आली असता गाडीतून धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आले. क्षणाचा ही विलंब न करता चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली.आणि गाडीतून सर्व जण बाहेर पडले.

गाडी पूर्णपणे जळून खाक : गाडीचे बोनट उघडले असता त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला. त्यानंतर काही क्षणात गाडीने पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तो फोल ठरला आणि गाडी काही वेळात पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.