सटाणा (नाशिक ) - बागलाण तालुक्यात प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र पोपट पवार (वय २२) व पूजा बंडू गांगुर्डे (वय १८) रा. सावरगाव अशी आत्महत्या केलेल्या युगुलांची नावे आहेत. ही घटना पेठवे गावात घडली.
तरुणाने त्यांच्या हळदीच्या दिवशीच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. हळदीच्या दिवशी सकाळी मांडवासाठी आंब्याचे डहाळे तोडायला गेलेल्या मंडळींना रवींद्र व पूजाचा मृतदेह आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
स्थानिक पोलीस पाटील दयाराम पवार यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सटाणा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड करीत आहेत.