ETV Bharat / state

नाशिकच्या काळाराम मंदिरात इतिहासात पहिल्यांदाच रामनवमी भाविकांविनाच साजरी - कोरोना

नाशिकच्या ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावर्षीच्या उत्सवावर कोरोनाचे संकट असल्याने अवघ्या 4 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना हा उत्सव साजरा करण्यात आला.

kalaram mandir shri Ram Navami festival nashik
श्री काळाराम मंदिर नाशिक
author img

By

Published : Apr 2, 2020, 4:03 PM IST

Updated : Apr 2, 2020, 5:19 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील श्री काळाराम मंदिरातील श्रीरामनवमी उत्सवावर आज लॉकडाऊनचा प्रभाव पहायला मिळाला. अवघ्या चार पुजाऱ्यांच्या उपस्थितीत आजचा श्री रामजन्मोत्सव सोहळा पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच भाविकांविना हो सोहळा पार पडला आहे. कडेकोड पोलीस बंदोबस्त केल्याने कोणत्याही भाविकाला मंदिरात प्रवेश दिला गेला नाही. तसेच मंदिर परिसरात थांबण्यास देखील मज्जाव करण्यात आला होता.

श्री काळाराम मंदिरात अवघ्या 4 पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला रामनवमीचा सोहळा...

हेही वाचा... विशेष ! राम नामाच्या लेखनातून केली रामायणातील पात्रांची चित्रनिर्मिती

दरवर्षी रामनवमीला काळाराम मंदिरात मोठी गर्दी होते. यावर्षी मात्र सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला. दरवर्षी असणारी पारंपरिक आणि सांस्कृतीक कार्यक्रमांची रेलचेल यंदा पहायला मिळाली नाही. नागरिकांनी देखील परिस्थिमुळे मंदिराकडे गर्दी केली नाही. कोरोनाचे संकट दुर होऊदे आणि प्रभु रामचंद्राचे दर्शन आम्हाला लवकर मिळुदे, अशी मनोकामना सर्व नागरिकांनी घरबसल्या व्यक्त केली आहे.

Last Updated : Apr 2, 2020, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.