नाशिक - देशभरात आज बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तर ईद निमित्त देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. आज येवला येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाच्या वेळी भुजबळ उपस्थित होते. यावेळी त्यांनी आवाहन केले.
यावेळी नमाज पठणानंतर मुस्लीम बांधवांना भुजबळांनी बकरी ईद निमित्त शुभेच्छा देत देशातील पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करावी असे आवाहन केले. यावेळी सामुदायिक नमाज पठनाला मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.
बकरी ईद यालाच 'ईद -उल- जुहा' म्हटले जाते परमश्रेष्ठ परमेश्वराच्या भक्तीमार्गात केल्या गेलेल्या असीम त्यागाचे ईद-उल-जुहा हे प्रतीक आहे. आजच्या दिवशी मुस्लिम बांधव बोकडाचे बळी देऊन आणि मोठी दावत ठेऊन हा कुर्बाणी सण जल्लोषात साजरा करतात.