ETV Bharat / state

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा सूळसुळाट; सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोर कैद

मागील काही दिवसांपासून शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत. आज (बुधवार) सकाळी शहरातील हिरावाडी, काठे गल्ली, तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले.

सीसीटीव्ही चित्रीकरणात दोन चोर कैद
author img

By

Published : Aug 28, 2019, 4:47 PM IST

नाशिक - शहरात मागील काही दिवसांपासून सोनसाखळी (चेन स्नॅचिंग) चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत.

नाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
आज (बुधवार) सकाळी शहरातील हिरावाडी, काठे गल्ली, तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले. यातील दोन महिला वयोवृद्ध आहेत. दरम्यान, सीसीटीव्ही कॅमेरामध्ये झालेल्या चित्रीकरणात दोन चोर कैद झाले आहेत. त्यात मोटरसायकल चालवणाऱ्या चोरट्याने हेल्मेट परिधान केले आहे, तर त्यांच्या मागे बसलेल्या चोरट्याने मास्क घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. चोरी करणारी इराणी लोकांची टोळी असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. मात्र, शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तसेच यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असतात. अशावेळी पोलिसांसमोर चेन स्नॅचिंगच्या घटना थांबवण्याचे मोठे आव्हान आहे.

Intro:नाशिक मध्ये चॅन स्नाचिंग चोरांचा धुमाकूळ,मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या महिलांचे मंगळसूत्र लांबवले...

Body:नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे, शहरातील विविध भागात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत,

आज सकाळीच्या सुमारास शहरातील हिरावाडी ,काठे गल्ली, तसेच गंगापूर रोड परिसरामध्ये मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार झाले..सकाळच्या सुमारास गर्दी कमी गर्दी असलेल्या ठिकाणी एकट्या महिलांना बघून त्यांच्या गळ्यातील दागिने चोरट्यांनी लांबवले, यातील दोन महिला या वयोवृद्ध आहेत,यातील दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले असून,त्यात मोटरसायकल चालवणाऱ्या चोरट्याने हेल्मेट परिधान केलं आहे,तर त्यांच्या मागे बसलेल्या चोरट्याने मास्क घेतल्याचे स्पष्ट दिसून येत आहे...चोरी करणारी इराणी गॅंग असल्याचा पोलिसांचा संशय असून त्या दिशेने देखील पोलीस तपास करत आहे. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली, गेल्या दोन दिवसांपासून शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे ,तसेच यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील नागरिकप्रश्नचिन्ह उपस्थित करू लागले,येणाऱ्या गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत असतात अशावेळी पोलिसांसमोर चेन स्नॅचिंगच्या घटना रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे...

टीप सीसीटीव्ही फुटेज ftp

nsk -chain snathching viu

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.