नाशिक Burglary Case Nashik: शहरातील कॉलेज रोड, गंगापूर भागातील ठिकठिकाणी स्वतंत्र आलिशान बंगले हेरून अत्याधुनिक साहित्यांचा वापर करून घरफोड्या करणाऱ्या दोघा उच्चशिक्षित गुन्हेगारांना पकडण्यात नाशिकच्या गुन्हे शोध पथकाला यश आलं आहे. (Burglary Case Cracked) विशेष म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी हे दोघेही घरफोड्या करीत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. यामधील मुख्य सूत्रधार असलेल्या संशयित रोहन भोळे याचा शेअर्समध्ये दोन कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ असल्याचं आणि एक कोटीचे तीन फ्लॅट वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या मालकीचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
चोरट्यांची चोरीची पद्धतच न्यारी: पकडण्यात आलेले चोर नाशिक शहरासह परिसरात बंगल्यातील मौल्यवान वस्तूंसह दागिने आणि पैसे चोरून बाहेरच्या राज्यात काही दिवस पळून जायचे. पुन्हा शहरात येऊन दोन-तीन ठिकाणी चोऱ्या करायच्या आणि त्या भागात पुन्हा जायचे नाही. अशा पध्दतीने संशयित रोहन भोळे आणि ऋषिकेश काळे या दोघांचीही इंजीनियरिंग झालेल्या तरुणांनी शहरात चोरी सत्र सुरू केलं होतं.
'या' चोरीमुळे चोरट्यांचे पितळ उघडे: गेल्या आठवड्यात गंगापूर पोलिसांच्या हद्दीत दुपारच्या वेळात शारदा नगर परिसरातील शरण बंगल्यात घरफोडी झाली. चोरट्यानं ग्रील कट करून कपाटातील तिजोरी, रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांसह महागडे घड्याळ चोरून नेले. अशात तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात दोघे संशयित कैद झाले. पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या कडून सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने कामगिरी केली.
संशयित असे आले जाळ्यात: गंगापूर रोड भागातील शरण यांच्या बंगल्यातून चोरी केलेले महागडे ब्लूटूथ आणि एअरबर्डस आठवड्याने त्यांचा वापर केला आणि तेथेच ते फसले. शोध पथकाने संशयितांचे मोबाईल लोकेशन ट्रेसिंगला लावले असतानाच या ब्लूटूथ वरून तक्रारदाराच्या मोबाईलवर लाईव्ह लोकेशन गेले. यानंतर पोलीस पथके पाठवून दमन येथून काळे आणि भोळे या दोघांना अटक केली गेली.
संशयित अधिकारी असल्याचे भासवत: संशयित काळे आणि भोळे यांच्या विरोधात यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असून, त्यांना अटक झाली आहे. सन 2022 मध्ये संशयितांनी उपनगर भागातील एका बंगल्यातून लाखोंचा ऐवज लंपास केला होता. तेव्हा कार वरील फास्टट्रॅक आणि एक स्टिकर वरून ते पोलिसांच्या हाती लागले होते. संशयित अस्खलित इंग्रजी बोलणारे असल्याने समोरच्यावर जणू बडा अधिकारी असल्याचे ते भासवत घरफोड्या करीत होते.
हेही वाचा: