नाशिक - दर चैत्रशुद्ध कालाष्टमीला येवला तालुक्यातील बोकटे येथे श्रीकाल भैरवनाथाची यात्रा असते. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या तीन जिल्ह्यातील भाविक बोकटे येथे येतात. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भवामुळे सलग दुसऱ्या वर्षी ही यात्रा रद्द करण्यात आली.
तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा -
श्रीकाल भैरवनाथाची यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा असते. सात दिवस हा यात्रौत्सव चालतो. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी यात्रा महोत्सव रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. मंदिर परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. बोकटे, देवळाणे, दुगलगाव येथील कोरोना समितीने बोकटे यात्रा कालावधीत मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन केले आहे.
सात दिवस असणार पोलीस बंदोबस्त -
१ मेपासून ते ७ मेपर्यंत येवला तालुक्यातील बोकटे मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास पोलीस प्रशासनातर्फे कठोर कारवाई करण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले.