ETV Bharat / state

Biometrics System : आश्रमशाळेत शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद बॉयोमेट्रिक्स प्रणालीने होणार - कळवण प्रकल्प

शिक्षक आश्रम शाळेत राहत नसल्याच्या तक्रारीनंतर आता नाशिक जिल्ह्यातील कळवण प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 40 शासकीय आश्रमशाळेत फेस बॉयोमेट्रिक्स प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे. अशी माहिती प्रकल्प अधिकारी विशाल नरवडे यांनी दिली त्यामुळे शिक्षकांच्या उपस्थितीची नोंद याच पध्दतीवर होणार आहे.(Biometrics System )

biometrics system
बॉयोमेट्रिक्स प्रणाली
author img

By

Published : Aug 1, 2023, 8:23 PM IST

नाशिक : शासकीय आश्रम शाळेत शिक्षकांकडून तारखा बदलून उपस्थिती दाखवण्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. तसेच शिक्षक शाळेवर राहत नसल्याच्या तक्रारी सुद्धा आदिवासी विभागाला प्राप्त झाल्या होत्या, त्यामुळे आता शिक्षक, कर्मचारी आश्रम शाळेत कधी आले व कधी गेले या माहितीची ऑनलाईन नोंद होणार आहे. यासाठी फेस बाय मॅट्रिक्स प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असल्याचे अधिकारी विशाल नरवडे यांनी सांगितले, ही प्रणाली बसवण्यात आल्यानंतर एका दिवसात 1 हजार फोटो काढण्याची या कॅमेर्‍याची क्षमता आहे,

कळवण प्रकल्प कार्यालयात याचा डेमो करण्यात आल्यानंतर आता प्रत्येक आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकां समोर डेमो सादर करण्यात येणार आहे, प्रत्येक कॅमेऱ्याची लिंक कळवण प्रकल्प कार्यालयास जोडली जाणार आहे,यात वापरण्यात येणाऱ्या कॅमेऱ्याची किंमत 21 हजार रुपये इतकी आहे. शिक्षकांकडून तारखा बदलून उपस्थिती दाखवण्याचे प्रकार अनेक शिक्षक,कर्मचारी कार्यस्थळी राहत नाहित. शहरातून ये जा करतात.

यावर पर्याय म्हणून यापूर्वी सकाळी व रात्री आश्रम शाळेच्या आवारात गुगल मॅपचा आधार घेत फोटो काढून ते तो प्रकल्प कार्यालयास पाठवण्याचे नियोजन केले होते. मात्र यात काही कर्मचारी तारीख बदल करून गैरफायदा घेत असल्याचे समोर आले. त्यानंतर दुसरा पर्याय म्हणून आश्रम शाळेची वेळ सकाळी 8:45 ते सायंकाळी 4 अशी करण्यात आली त्यानंतर आता फेस बाय मॅट्रिक्स ही प्रणाली वापरण्यात येणार आहे.

प्रकल्पांतर्गत एकूण 40 अनुदानित आश्रमशाळा सह 29 शासकीय वस्तीगृहातही ही प्रणाली बसवण्यात येणार आहे काही दिवसानंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची हजेरी ही या प्रणाली द्वारे घेण्यात येणार आहे अशी माहितीही प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी नरवडे यांनी दिली. शाळेची वेळ नवीन वार्षिक वेळापत्रकानुसार सकाळी 8. 45 ते दुपारी 4 वाजेपर्यंतआहे. मात्र राज्यभरातील शिक्षकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवत असून शाळेची वेळ विद्यार्थ्यांना गैरसोयीची असल्याचे म्हणत, वेळ पूर्ववत करण्याची मागणी केली.

या निर्णयाला विरोध सुरू झाला आहे. शासनाला पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये असलेले विद्यार्थी दुर्गम,डोंगराळ भागातून शाळेत येत असतात. शाळेची वेळ सकाळी 8.45 वाजेची करण्यात आल्याने, विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकणार नाहीत,किंबहुना त्यांना पहाटे लवकर उठावे लागले, तर त्यांची पुरेशी झोप होणार नसल्याने, विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही वेळ बदलावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.