नाशिक - ऑक्टोबर 2021मध्ये कोरोना काळात आत्यावर नाशिकच्या सुश्रुत हॉस्पिटलमध्ये ( Nashik Sushrut Hospital ) उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. आत्याच्या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा राग मनात धरून संशयित भाच्याने मित्रांसह डाॅ. प्राची पवार यांच्यावर हल्ला ( Attack on doctor in Nashik Sushrut Hospital ) केल्याचे समारे आले आहे.
डॉ. प्राची पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला - अभिषेक शिंदे असे संशयिताचे नाव असून त्याने दोघा साथीदारांसोबत डॉ. प्राची पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संशयित अभिषेक याने गुन्ह्यात सहभागी दोघा मित्रांना प्रत्येकी 10 हजार रुपये देण्याचे कबूल केले होते.
तीघाना अटक - डॉ. प्राची पवार हल्ला प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार संशयित अभिषेक दीपक शिंदे, पवन रमेश सोनवणे, धनंजय भवरे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी गंगापूर रोडवरील गोवर्धन शिवारातील पवार डाॅ. प्राची पवार यांच्यावर हल्ला केला होता. आरोपीने डॉ.प्राची पवार यांच्या कारला दुचाकी आडवी लावत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर धार धार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सध्या डॉ. प्राची पवार यांची प्रकृती स्थिर आहे.