नाशिक - लैंगिक अत्याचाराप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या आसाराम बापू या कथित आध्यात्मिक गुरूच्या उदात्तीकरणासाठी महापालिकेच्या शाळेचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शिष्यांवर बलात्काराचा आरोप असलेल्या आसाराम बापूचा फोटो लावून संस्कृतीचा पाठ शिकवण्यात आल्याने 'हे राम' म्हणत डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.
नाशिकच्या सातपूर येथील महानगर पालिकेच्या शाळेत आसाराम बापूच्या विचारांचे पत्रक, शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी तासिका थांबवून वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरावरून आसाराम बापू याची प्रतिमा उजळ करण्याचा हा प्रकार असल्याचे दिसत आहे. मात्र, या संदर्भात कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच हा प्रकार महापालिकेच्या शाळेत घडणे ही गंभीर बाब आहे. याबाबत तत्काळ चौकशी करून जे कोणी यात दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.
हेही वाचा - सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या दोन चोरट्यांना नाशिक पोलिसांनी केले जेरबंद
हेही वाचा - खळबळजनक! क्षुल्लक वादातून सासूचा खून, २४ तासात घटनेची उकल