नाशिक :अपघातात प्रभाकर सुधाकर आडाेळे(२५), कुशल सुधाकर आडाेळे(२२), रोहित भगीरथ आडोळे (१९) अशी मृत युवकांची नावे आहेत. मुंबई आग्रा महामार्गावर इगतपुरी येथील पंढरपूरवाडी भागात भरधाव आयशरने बैलगाडी आणि मोटारसायकला धडक दिल्याने अपघात झाला.इगतपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यक्ती इगतपुरीच्या ग्रामीण रुग्णालय ( Igatpuri Rural Hospital ) येथे दाखल करण्यात आले आहे. भरधाव आयशरचा चालक पसार झाला आहे. ( Speeding Eicher Hit In Nashik )
पोलिसांचे वाहन तीनदा उलटले : ( police vehicle overturned three times ) बुधवारी सकाळी येथीलच ( Eicher Hit bullock cart ) गोंदे औद्योगिक वसाहतीतील लिअर कंपनीजवळ पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जातांना ही घटना झाली. पोलिसांचे वाहन तीनदा उलटले. विशेष म्हणजे यात तीन वाहनांचा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेत नाशिक शहर मध्यवर्ती गुन्हेशाखेचे ३ पोलीस जखमी झाले. त्यात संतोष भगवान सौंदाणे(५७), सचिन परमेश्वर सुपले(४३) व रविंद्र नारायन चौधरी(३७) अशी जखमी पोलिसांची नावे आहेत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांना अपघाताची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने अपघाताच्या ठिकाणी दाखल होऊन जखमींना वाडीवऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे.रम्मी राजपूत,सचिन मडलीक गुन्ह्या प्रकरणी हायकोर्टात एफिडेविट देण्यासाठी जाणाऱ्या सरकारी वाहनाचा विचित्र अपघात झाला आहे. अपघात तीन पोलीस जखमी झाले आहेत. ( Nashik Road Accident )
बस थेट नाल्यात गेली : या आधीही नाशिक येथे नऊ जानेवारी रोजी बुलढाणा जवळच्या चांडोल गाव येथील 29 भाविक स्कुलबसने त्र्यंबकेश्वर येथे ( Brahmagiri Hill Trimbakeshwar ) देवदर्शनासाठी आले होते.ञ्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे सर्व भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्याचा निर्णय घेताला. ब्रह्मगिरी पर्वतावरील गोदावरी जन्मस्थान मंदिरातील देव दर्शन आटोपून दुपारी एक वाजेच्या सुमारास खाली उतरून आले. शहरात आल्यानंतर त्यांची मिनी बस थेट ब्रह्मगिरी पायथा येथ पर्यंत आणून उभी केलेली होती. बसमध्ये सर्व प्रवासी बसल्यानंतर उतारावर बस भराधाव निघाली. उतारावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने तेथील वळणावर बस थेट नाल्यात गेली. या अपघातात 13 लोक गंभीर जखमी झाले होते.