मास्क लावा...! अन्यथा, नाशिक मनपा आयुक्तांनी दिले 'हे' आदेश - nashik corona update
कोरोना आपल्याकडे चालुन येत नाही तर आपण कोरोनाकडे चालून जात आहोत. म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क वापरणे, या अत्यावश्यक बाबी होऊन बसल्या आहेत. लोकांना सूचना देऊनही ते मास्क वापरत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवत नाहीत म्हणून एपीडेमीक कायद्यांतर्गत ही कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
नाशिक - शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेत प्रशासनाने कठोर पावले उचलायला सुरूवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरात घरातून बाहेर पडताना मास्क न वापरल्यास 200 रुपये दंड करण्याचे आदेश, महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.
एपीडेमिक अॅक्ट अंतर्गत ही कारवाई केली जाणार आहे. शहरात कोरोनाचे 440 तर जिल्ह्यात तब्बल 2063 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. यामुळेच महापालिकेने हा निर्णय घेतला. आता कोरोना बरोबर जगायला शिकले पाहिजे. कोरोना आपल्याकडे चालुन येत नाही तर आपण कोरोनाकडे चालून जात आहोत. म्हणून सार्वजनिक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क वापरणे, या अत्यावश्यक बाबी होऊन बसल्या आहेत. लोकांना सूचना देऊनही ते मास्क वापरत नाहीत. फिजिकल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवत नाहीत म्हणून एपीडेमीक कायद्यांतर्गत ही कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
थोडक्यात काय आहे एपीडेमिक अॅक्ट?
भारतात इंग्रजांची सत्ता असताना 1897 मध्ये प्लेग या रोगाची साथ आली होती. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी साथरोग अधिनियम 1897 (एपीडेमिक अॅक्ट 1897) हा कायदा अस्तित्त्वात आणला. हा कायदा लागू केल्यानंतर नेमक्या काय उपाययोजना अथवा कृती करायी असते, याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. यानंतर 1989 मध्ये या कायद्यात घटनादुरूस्तीही करण्यात आली होती. हा कायदा साथीचे रोगाच्या प्रसारावर परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी आहे.