नाशिक - जिल्ह्यातील लासलगाव येथे अॅपे रिक्षा व हायवा ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन पाच जण ठार झाले आहेत.
हेही वाचा - पितृपक्षात या गोष्टी केल्या तर मिळतील पितरांचे आशिर्वाद
लासलगाव विंचूर रोडवर लासलगाव जवळील मंजुळा पॅलेसजवळ सायंकाळच्या दरम्यान अॅपे रिक्षा व हायवा ट्रक यांच्यात भिषण अपघात झाला. यात रिक्षामधील रिक्षा चालक व चार प्रवासी असे पाच जण ठार झाले. यापैकी चार जण जागीच ठार तर, एक अत्यवस्थ होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
अॅपे रिक्षामधील दोन प्रवासी हे अंत्यविधीकरिता सकाळी लासलगाव येथे आले होते. अंत्यविधीचा कार्यक्रम आवरून सायंकाळच्या वेळेस ते आपल्या घरी रिक्षातून लासलगाववरून विंचूर येथे जात होते. दरम्यान विंचूर दिशेने लासलगावकडे येणारा हायवा ट्रक व रिक्षात भीषण अपघात झाला. यात रिक्षाचालकासह 5 जण ठार झाले.
या अपघातात राहता तालुक्यातील लोणी प्रवारा येथील दोन जणांचा समावेश आहे, तर रिक्षा चालक विंचूर येथील रहिवाशी आहे. पोलिसांनी हायवा ट्रक चालकास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - पितृपक्षात भाज्या कडाडल्या : गवार 160 तर वांगी 80 रुपये किलो