ETV Bharat / state

सिन्नर येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू , पोलीस तपास सुरू - विंचूरदळवी येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेत महिलेचा घरात खून करून मृतदेह रस्त्याच्या कडेला आणून टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सिन्नर येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:47 AM IST

नाशिक - सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. हिराबाई नामदेव भोर असे मृत महिलेचे नाव असून तिचा घरात खून करून रस्त्याच्याकडेला आणून टाकत अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सिन्नर येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू

अधिक माहितीनुसार, विंचूरदळवी येथील हिराबाईचा मृतदेह सोमवारी सकाळी रस्त्याच्या कडेला आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती तर, सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

हेही वाचा - आपटेपाडा-दरा शिवारातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास

या घटनेत महिलेच्या चेहऱ्यावर वार झाल्याचे दिसत असून घरातून मृतदेह फरफटत नेल्याचेही प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे हत्या करून अपघाताचा बनाव केल्याचा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. तर, मृत महिला वृद्ध पतीसोबत एकटीच राहत असल्याची माहिती असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

हेही वाचा - नाशिकमधील पक्षीप्रेमी अवलिया, फक्त पितृपक्षच नव्हे तर येथे रोज देतात कावळ्यांना घास

Intro:नाशिक सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी येथे 55 वर्षीय महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळून आले आहे. हिराबाई नामदेव भोर असे मृत महिलेचे नाव असुन तर घरामध्ये खून करून तिला रस्त्याच्याकडेला आणून टाकत अपघाती मृत्यूचा बनाव केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.Body:अधिक माहिती अशी की, विंचूर दळवी येथील
हिराबाई नामदेव भोर यांचा मृतदेह आज
सकाळी रस्त्याच्या कडेला आढळून आला. या
घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन सिन्नर
पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सिन्नर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेConclusion:महिलेच्या चेहऱ्यावर वार झाल्याचे निदर्शनास येत
आहे. तसेच घरातून मृतदेह फरफटत नेल्याचेही
प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. त्यामुळे हत्या
करून अपघाताचा बनाव केल्याचा अंदाज पोलीस
सूत्रांनी व्यक्त केला आहे. मृत महिला वृद्ध पतीसोबत एकटीच राहत असल्याची माहिती मिळते आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.