नाशिक - संततधार पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाली या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनद व चणकापूर धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. धरण परिसरातील सततच्या पावसाने जलसंपदा विभागाने पुनद धरणातून तीन हजार क्युसेक पाणी टप्प्या-टप्प्याने गिरणा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या पुनद मध्ये 50% व चणकापूर धरणात 39% पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने गिरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे खरिप हंगामातून मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदाच्या पावसाने जनावरांचा चारा तसेच कसमादे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.
नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याने स्थानिक शेतकरी वर्गात नाराजी होती परंतू, दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला आहे.
कसमादे परिसरात जून व जुलै महिन्यात पडलेल्या पाऊसाची आकडेवारी -
1) देवळाली 3.2 / 167.9 मिमी
2)मालेगाव 4.0 / 278.0 मिमी
3)बागलाण. 24.0 /305.0मिमी
4)कळवण. 12.0 /168.0 मिमी