नाशिक - मालेगाव ( Malegaon ) काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख ( Ex. MLA Rashid Sheikh ) कुटुंबियांत गेले सहा महिने सुरु असलेले राजकीय नाट्य सुरू, त्यांची पत्नी व महापौर ताहेरा शेख ( Mayor Tahera Sheikh ) यांच्यासह 27 नगरसेवकांनी आज (मंगळवारी) काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. तसेच 27 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश ( 27 Congress Corporators Join NCP ) करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
'काँग्रेसमध्ये कामे होत नाही'
मालेगाव शहराच्या विकासासाठी आम्हाला काम करायचे आहे. त्यासाठी विविध निधी व योजनांना मंजूरी हवी आहे. मात्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात वगळता अन्य कोणीही मंत्री आम्हाला प्रतिसाद देत नाही. त्यामुळे आमची नाराजी होती. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. उर्जा खाते काँग्रेस पक्षाकडे आहे. मात्र गेल्या दोन वर्षात मालेगाव शहरासाठी काहीही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच आम्ही काँग्रेस पक्षात राहून काहीही उपयोग नाही. म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असे माजी आमदार रशीद शेख यांनी म्हटले आहे. यावेळी महापौर ताहेरा शेख यांसह मालेगाव महापालिकेचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
काँग्रेसमध्ये स्पर्धा
माजी आमदार आसीफ शेख यांनी सहा महिन्यांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर रशीद शेख यांनी उघडपणे राष्ट्रवादीच्या दिशेने पावले टाकत राजकीय वाटचाल सुरु केली होती. या निर्णयाने मालेगाव शहरात यापुढे दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा बघायला मिळणार आहे.
हेही वाचा - VIDEO : किरीट सोमैया राजकीय आयटम गर्ल सारखं वागताय - मंत्री नवाब मलिक