नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असुन गेल्या 24 तासात जिल्ह्यात 204 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आहेत. यामध्ये 162 रुग्ण एकट्या नाशिक शहरातील आहे, तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
शहरात रोज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. यामुळे शहरातील रूग्णांची संख्या 2 हजार 942 झाली आहे. तर जिल्ह्यातील करोनाग्रस्तांची एकुण संख्या 5 हजार 391 झाली आहे. तर एकाच दिवसात जिल्ह्यातून 662 नवे संशयित दाखल झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 277 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - COVID-19 : राज्यात आज आढळले ६,५५५ नवे रुग्ण; तर ३,६५८ रुग्णांना डिस्चार्ज..
जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 134 वर स्थिर आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 165 रूग्णांनी करोनावर मात असून करोनामुक्त रुग्णांचा आकडा 2984 वर पोहचला आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून 25 हजार 248 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यामधील 18 हजार 296 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर 5 हजार 391 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. यातील 2062 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.