नंदुरबार : दुर्गम भागातील अक्कलकुवा तालुक्यातील दाबच्या काकडीपाडा येथे जादुटोणा केल्याच्या संशयातून हातबांधून एका महिलेला स्मशानभूमीत घेवुन जावून मारहाण ( woman was taken to graveyard and beaten up ) करीत जखमी केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चौघांविरुध्द मोलगी पोलिस ठाण्यात ( Molgi police station ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघा संशयीताविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
40 वर्षीय महिलेवर जादुटोणा करण्याचा संशय : धडगाव तालुक्यातील डाबचा कुकरखाडीपाडा येथील एका 40 वर्षीय महिलेवर जादुटोणा करण्याचा संशय घेण्यात आला. या महिलेने जादुटोणा करीत संशयित मोकन्या खेमा वसावे यांच्या बहिणीला मारले, असा संशय घेतला. या संशयातून चौघांनी सदर महिलेचे दोरीने हात बांधुन सायंकाळच्या सुमारास स्मशाभूमीत घेवुन गेले. त्याठिकाणी महिलेला स्मशानभूमीस हात लावण्यासह गोल चक्कर मारण्यास सांगत शपथ घेण्यास भाग पाडले. तसेच काठी व नॉयलॉन दोरीने मारहाण करीत महिलेला जखमी करण्यात आले.
अन्साराम आगरकर तपास करीत आहेत : याबाबत पिडीत महिलेने मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोकन्या खेमा वसावे, हुवलाबाई मोकन्या वसावे, वंती खेमा वसावे, रायकीबाई दिवाल्या वसावे राहणार डाबचा कुकरखाडीपाडा या चौघांविरुध्द भादंवि कलम 323, 34 सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर करीत आहेत.