ETV Bharat / state

जैन संघाकडून नंदुरबारला 100 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट - nandurbar corona news

250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी 100 यंत्र भारतीय जैन संघाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले.

नंदुरबार
नंदुरबार
author img

By

Published : Apr 30, 2021, 11:16 AM IST

नंदुरबार - विमला सुखीदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी भेट म्हणून देण्यात आलेल्या 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरपैकी 100 यंत्र भारतीय जैन संघाने जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केले. हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर यंत्र नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागासाठी महत्त्वाचे असणार आहे. असे जिल्हा अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सांगितले.

भारतीय जैन संघ आणि ओसवाल परिवाराने जिल्हा प्रशासनाला मौलिक मदत

कोरोनामुळे देशभरात मोठे संकट उभे असून त्याविरुद्ध एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. भारतीय जैन संघ आणि ओसवाल परिवाराने 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देऊन संकटाच्या प्रसंगी प्रशासनाला मौलिक सहकार्य केले आहे. या कुटुंबाचे कार्य नंदुरबार जिल्ह्यासाठी महत्वाचे आहे. ऑक्सिजन पातळी 90 ते 95 दरम्यान असलेल्या ग्रामीण भागातील रुग्णांवर स्थानिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपयुक्त आहेत. प्रशासनातर्फेदेखील आणखी 280 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेण्यात येणार असून ऑक्सिजन सिलेंडर पोहोचू न शकणाऱ्या दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयात ते उपलब्ध करून देण्यात येतील.

दुर्गम भागातील जनतेला या यंत्रांचा उपयोग -खा. डॉ. हिना गावीत

खासदार डॉ. हिना गावीत म्हणाल्या, भारतीय जैन संघाने जिल्ह्यासाठी चांगले योगदान दिले आहे. कोरोना संकटाच्या कठीण परिस्थितीत त्यांनी दिलेली मदत जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. केवळ ऑक्सिजनमुळे बरे होऊ शकणाऱ्या दुर्गम भागातील जनतेला या यंत्रांचा उपयोग होणार आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसोबत देण्यात येणारी रुग्णवाहिकादेखील ग्रामीण भागासाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. ओसवाल कुटुंबियांना त्यांनी जिल्ह्याच्यावतीने धन्यवाद दिले.

गौतम जैन म्हणाले, विमलादेवी यांनी जिल्ह्यासाठी मदत देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर प्रशासनाशी चर्चा करून 250 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि एक रुग्णवाहिका जिल्ह्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला.उर्वरीत यंत्र व रुग्णवाहिका लवकरच प्रशानाला उपलब्ध करून देण्यात येईल. दुर्गम आणि ग्रामीण भागात या यंत्रांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांची उपस्थिती

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला खासदार डॉ.हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड आदी उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, महेश सुधळकर, तहसीलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, सुरेश तातेड, विजूभाई तातेड, लोणचंद तातेड,देवेंद्र तातेड आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.