नंदुरबार - विजयादशमी निमित्त शहादा शहरातील मारुती मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रावण दहन करण्यात आले. तीस फूट उंच रावणाच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते दहन करण्यात आले.
हेही वाचा - तुळजाभवानीचा सीमोल्लंघन सोहळा, 108 साड्या गुंडाळून पालखी काढल्यानंतर तुळजाभवानी निद्रित
यावर्षी विजयादशमी निमीत्त तीस फूट उंची ची रावणाचा पुतळा तयार करण्यात आला होता. शहरातील मान्यवरांच्या हस्ते ज्योत प्रज्वलीत करून रावण दहन करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजीही करण्यात आली. रावण दहना नंतर शहरात दसऱ्याला सुरुवात होत असते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.