ETV Bharat / state

अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव - fungas on papaya crop

अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पपई बागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच योग्य दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता.

अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका
अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका
author img

By

Published : Jan 13, 2021, 2:24 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होणारा अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पपई पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे फळे खराब होत आहेत. तर अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पपई बागांवर होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच योग्य दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी अडचणीत होता.

पपईसाठी दुष्काळात तेरावा महिना
गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याबरोबर तयार झालेला माल कमी दरात विकावा लागला होता. यंदा गेल्या वर्षाची भर निघून येईल असा अंदाज सूत्रांनी वर्तवला होता. मात्र तयार झालेल्या पपई पिकावर यंदा दुसऱ्यांना अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशी गत झाली आहे.

अवकाळी पावसाचा पपई उत्पादकांना फटका
नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणीअवकाळी पावसामुळे तयार झालेल्या पपई पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे तर फक्त पंचनामे न करता पपई उत्पादक शेतकऱ्यांना ही सरकारने मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भावबेमोसमी झालेल्या पावसामुळे पपईचे फळ तयार झाले असताना त्या पिकावर बेमोसमी पाण्याचा मारा पडल्याने घोषित अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या रोगांवर कुठल्याही औषधांचा परिणाम होणार नाही अशी देखील माहिती शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.

हेही वाचा - बीएमसीची कारवाई, सोनू सूद पवारांच्या दारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.