ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला उडवले; आजोबासह नातवाचा मृत्यू - नंदुरबार अपघात न्यूज

भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यात पाच वर्षीय नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घोटाणे गावाजवळ घडली आहे.

nandurbar accident
नंदुरबारमध्ये अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू
author img

By

Published : Nov 26, 2019, 8:58 AM IST

नंदुरबार - भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघात झाला. यात पाच वर्षीय नातवासह आजोबांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घोटाणे गावाजवळ घडली आहे. या घटनेमुळे घोटाणे गावावर शोककळा पसरली असून सोमवारी सायंकाळी उशिरा या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघाताप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

accident
नंदुरबारमध्ये अपघातात आजोबासह नातवाचा मृत्यू

हेही वाचा - 'फिक्सिंग' झाले तरी सत्यमेव जयतेचाच विजय; 'सामना'तून भाजपवर निशाणा

सध्या गहू पेरणीचा हंगाम सुरू असल्याने घोटाणे येथील नानाभाऊ उखा धनगर हे गव्हाचे बियाणे घेण्यासाठी दोंडाईचा येथे गेले होते. डिस्कव्हर मोटारसायकलने (एमएच 39 एच 6724) दोंडाईचाकडून घोटाणे गावी परत येत होते. यावेळी नंदुरबारकडून दोंडाईचाकडे भरधाव वेगात जाणारी स्कॉर्पिओने (जीजे.19 ए 8362) दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नानाभाऊ उखा धनगर (55 वर्ष) व त्यांचा नातू रोहित भटु धनगर ( 5 वर्षे) हे दोघेही दूरवर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागून शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला.

घटनेची माहिती मिळताच घोटाणे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आजोबा व नातवाला तत्काळ दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केले.

जितेंद्र दुर्लब धनगर यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ चालक राजेश जयचंद थवाने (रा.सोनगढ, गुजरात) यांच्याविरुद्ध नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मोटारवाहन कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल बागल करत आहेत.

Intro:नंदुरबार - भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला उडविल्याने भीषण अपघातात पाच वर्षीय नातुसह आजोबा जागीच ठार झाल्याची घटना घोटाणे गावानजीक घडली आहे. या घटनेमुळे घोटाणे गावावर शोककळा पसरली असून काल सायंकाळी उशिरा या दोघा मयतांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या अपघातप्रकरणी स्कॉर्पिओ चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:सध्या गहु पेरणीच्या हंगाम सुरु असल्याने घोटाणे येथील नानाभाऊ उखा धनगर हे गव्हाचे बियाणे घेण्यासाठी दोंडाईचा येथे गेले होते. डिस्कव्हर मोटारसायकल क्र.एम.एच.39 एच.6724 ने दोंडाईचाकडून घोटाणे गावी परत येत असतांना नंदुरबारकडुन दोंडाईचाकडे भरधाव वेगात जाणारी स्कॉर्पिओ क्र.जी.जे.19 ए.8362 ने दुचाकीला उडविल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात नानाभाऊ उखा धनगर (वय 55) व त्यांचा नातु रोहित भटु धनगर (वय 5 वर्षे) हे दोघेही दुरवर फेकले गेल्याने त्यांना जबर मार लागुन शरीरातुन रक्तस्त्राव सुरु झाला. घटनेची माहिती मिळताच घोटाणे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आजोबा व नातुला तात्काळ दोंडाईचा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांची तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घोटाणे ग्रामस्थांसह न्याहली ग्रामस्थांनी धाव घेतली. या दुर्दैवी अपघातात एकाच घरातील आजोबा व नातु ठार झाल्याची वार्ता पसरल्यानंतर घोटाणे गावावर एकच शोककळा पसरली. काल सायंकाळी उशिरा मयत नानाभाऊ धनगर व त्यांचा नातु रोहित भटु धनगर यांच्या मृतदेहावर शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघा आजोबा व नातुवर अंत्यसंस्कार झाल्यावर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. जितेंद्र दुर्लब धनगर यांच्या फिर्यादीवरुन स्कॉर्पिओचालक राजेश जयचंद थवाने (रा.सोनगढ, गुजरात) यांच्याविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मोटारवाहन कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय हर्षल बागल करित आहेत.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.