नंदुरबार - शहादा तालुक्यातील फेस या गावात शासकीय जमिनीवरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड करण्यात आली होती. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाला तक्रार केली. एकूण 180 झाडांची तोड करण्यात आली होती. त्यामुळे अज्ञातांविरुध्द गुन्हा दाखल करत वन विभागाने सर्व लाकुडफाटा जप्त केला.
वन विभागाने या कारवाईनंतर मात्र, एक अजब पत्र काढले आहे. वृक्षतोड करणार्या माफियांवर कारवाई करण्यासाठी, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांनी वन विभागाकडे तक्रारी केली होती. त्याच तक्रारदारांना नोटीस काढून वनविभागाने चौकशीला हजर राहण्यास सांगितले आहे.
हेही वाचा... VIDEO: वेडात मराठे वीर दौडले सात.. सरसेनापती प्रतापराव गुजरांचा भीमपराक्रम
'आपण चौकशीस हजर न राहिल्यास प्रकरण निकाली काढण्यात येईल' असा सज्जड दम वनविभागाने तक्रारदार व्यक्तींना दिला. त्यामुळे वन विभागाचा वृक्षतोड करणार्या माफियांना पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणामुळे पर्यावरण प्रेमींनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून वन विभागाच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.