ETV Bharat / state

कौतुकास्पद..! चौदा किलोमीटर पायपीट करून अंगणवाडी सेविका पोहचवते पोषण आहार

नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका रेणू रमेश वसावे ही अतिदुर्गम भागात देखील स्वत: आहार पोहोचवते. कधी गाडी तर कधी पायवाट तर कधी होडीतून ती पोषण आहार पुरविण्याचे काम करत आहे.

This Anganwadi worker in Nandurbar walks 14 Km everyday to provide Nutrition diet to pregnant women
कौतूकास्पद..! चौदा किलोमीटर पायपीट करून अंगणवाडी सेविका पोहचवते पोषण आहार
author img

By

Published : Nov 16, 2020, 2:03 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील अक्कलकुवा व धडगाव हे दोन तालुके अतिदुर्गम भागात येतात. अतिदुर्गम भागातील नर्मदा काठावरील जीवन तर अतिशय खडतर आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत रेणू रमेश वसावे ही अंगणवाडी सेविका नर्मदा भागात स्वत: आहार पोहोचवते. कधी गाडी तर कधी पायवाट तर कधी होडीतून ती पोषण आहार पुरविण्याचे काम करत आहे. नवजात ते सहा वर्षांच्या बालकांना तसेच स्तनदा माता, गरोदर माता, किशोरवयीन मुलींना विविध आहाराचे वाटपाचे काम ती विनातक्रार करत आहे. चिमलखेडी परिसरात नर्मदा नदी व पहाडचा परिसर त्यामुळे तिला सतत या पहाडात तर कधी नर्मदा नदीच्या पलिकडे राहणाऱ्या बालकांच्या घरी जावून गृहभेट द्यावी लागते.

रेणू वसावे बोलताना...
होडीतून प्रवास करून जनजागृती
नर्मदा नदीच्या पलीकडे बालकांची व मातांची घरे आहेत. यासाठी ती स्वत:च्या पैशातून होडी अथवा बोटीने या काठावरून त्या काठावर जाते. हे करत असताना महिलांच्या बैठका घेऊन हात धुण्याविषयी ती सतत जनजागृती करते.
कोरोना नियमांचे योग्य पालन
कोविडची लागण दुर्गम भागात पोहचू नये, यासाठी तिने घराघरात जावून कोविडचे गांभीर्य पोहचवले व कोरोनाबाबत नियमांचे पालन करावे याबाबत समजावले. त्याचबरोबर कोरोनाशी सामना करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी, याबाबत रेणु वसावे समजावते.
दळणवळणांच्या साधनांचा अभाव
दुर्गम भागात दळणवळणाच्या साधनांसह संपर्काचा अभाव असल्याने एखादे बालक गंभीर आजारी असेल तर तो निरोप फिरत्या दवाखान्याच्या डॉक्टरांपर्यंतही पोहचवण्याचे काम रेणू वसावे करीत आहे. त्यामुळे रेणू ही या भागातील समन्वयाचे उत्तम असे माध्यमच बनली आहे.
गर्भवती मातांचे समुपदेशन
गर्भवती मातांच्या प्रति तिची धडपड कमालीची आहे. मातांना सातत्याने समपुदेशन करते. मुलांना खोकला आला तर त्या मुलाला दवाखान्यात न्यायचा सल्लाही ती देते. तिला चिमलखेडी पासून लांब असलेल्या मोलगी गावातही राहायचा प्रसंग पडला तरीही तिची कधीच तक्रार नसते. कधी या डोंगरावर तर कधी त्या डोंगरावर सतत तिची भटकंती सुरूच आहे.
कमी वेतनातून देते कामाचा योग्य मोबदला
वेतन किती मिळते यापेक्षा आपण केल्याने किती जणांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते हे महत्वाचे आहे, असे तिचे म्हणणे आहे. एकात्मिक बाल विकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा व योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा म्हणून तिची धडपड निश्चितच कौतुकास्पद आहे. सोनाबाई बिज्या वसावे व सविताबाई दिल्या वसावे या आशा कार्यकर्तींच्या मदतीने तिचे काम अव्याहतपणे सुरूच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.