नंदुरबार - जिल्हा परिषदेच्या निकालानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांचे कार्यालय जाळल्याची घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालाच्या वादातून ही जाळपोळ झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकारानंतर अक्कलकुवा येथे काही काळ तणावपूर्ण वातावरण होते.
गुरुवारी सकाळी ही घटना समजल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यालयावर गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यासाठी अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांनी घेराव घातला. अक्कलकुवा शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट असून तणावपूर्ण शांतता आहे.
हेही वाचा - दिल्लीत 'प्रिंटीग प्रेस'ला लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू; शोधकार्य सुरू
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बहुमत मिळाले आहे. निकालानंतर लगेचच सेना कार्यालयाला आग लावल्याची घटना घडल्याने हा राजकीय वैमनस्याचा प्रकार असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.