ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवा - अब्दुल सत्तार - shivsena breaking news

दुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवा, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
author img

By

Published : Dec 24, 2020, 8:41 PM IST

नंदुरबार - राज्यात ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. भाजपला ग्रामपंचायत निवडणुकींच्या माध्यमातून धडा शिकवण्याची संधी शिवसैनिकांना उपलब्ध झाली आहे. म्हणुन नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवा, असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

अब्दुल सत्तार

राज्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेना शाखा फलकांचे अनावर-

राज्याचे महसूल राज्यमंत्री तथा शिवसेनेने नेते अब्दुल सत्तार हे नंदुरबार जिल्ह्या दौर्‍यावर आले आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे आगमन झाल्याने वाघेश्‍वरी चौफुलीवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे उपस्थित ‍वाघेश्वरी चौफुली व मोठा मारुती मंदिर चौकात शिवसेना शाखा फलकाचे अनावरण राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ च्या घोषणा दिल्या.

शिवसैनिकांचा मेळावा-

नंदुरबार शहरातील रघुवंशी मंगल कार्यालयात शिवसेनेचा जिल्हा मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे धुळे-नंदुरबार संपर्कप्रमुख बबनराव थोरात, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमदार मंजुळा गावित, शिवसेना नेते संजय उकिरडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी, नगरसेवक परवेज खान, महिला आघाडीचा जिल्हाध्यक्ष रीना पाडवी, उपजिल्हा प्रमुख रवींद्र गिरासे, रुपसिंग पाडवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश गावित, माजी जिल्हा परिषद सभापती विक्रमसिंग वळवी, तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती आकाश वळवी, माजी सभापती दत्तू चौरे, सतीश वळवी आदी उपस्थित होते.

अब्दुल सत्तार यांनी केलेले मिळाव्यात मार्गदर्शन-

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले की, वर्षभर शिवसेना संकटाचा मुकाबला करीत आहे. प्रत्येक संकटाशी मुकाबला करणे ही क्षमता शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आहे. राज्याचा कारभार नियोजनबद्ध सुरू असून गोरगरीब, शेतकरी, बहुजन, आदिवासी, ओबीसी त्याचप्रमाणे समाजातील सर्वच घटकांना न्याय देण्याचे काम शिवसेनेचे सरकार करीत आहे. नंदुरबार जिल्ह्याचा प्रत्येक महिन्याला दौरा करणार आहे. शिवसैनिकांनी गावातील विधवा माता-भगिनी, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांना मदतीचा हात द्यावा. त्यांना सरकारचा विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा. आचारसंहिता संपल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क ऑफिस उघडून जनतेच्या समस्यांचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांचे मेळाव्यात मार्गदर्शन-

यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना पोहोचवली. जिल्ह्याभरात गाव तिथे शिवसेनेच्या शाखा उघडण्यात येणार आहेत. शिवसैनिकांनी ग्रामपंचायतींच्या निवडणुका संघटीतपणे लढवायच्या आहे. शिवसेनासाठी जीवाचे रान करून येणार्‍या कालावधीत जिल्ह्यातील सर्वच निवडणुका शिवसेना पुरस्कृत लढवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. मेळाव्यात सेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जिल्हा प्रमुख डॉ.विक्रांत मोरे म्हणाले की, मागील पाच वर्षाच्या भाजप सरकारच्या काळात शेतकर्‍यांना घुमजाव करण्यात आले. परंतु, वर्षभरात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन अवकाळी पाऊस व अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सरसकट मदत केली.

हेही वाचा- मराठा समाजाला EWS आरक्षण; संघटनांमधून मात्र नाराजीचा सूर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.