ETV Bharat / state

Dhadgaon Nagar Panchayat Result : धडगाव नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता कायम; आदिवासी विकास मंत्र्यांना धक्का

नंदुरबार जिल्ह्यातल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत ( Dhadgaon Local Body Election 2022 ) शिवसेनेने आपली सत्ता राखली आहे. या निवडणुकीत आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी ( Minister K. C. Padwi ) यांच्यासह भाजपचे आमदार व खासदार यांनाही मोठा धक्का बसला आहे.

धडगाव
धडगाव नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता कायम
author img

By

Published : Jan 19, 2022, 7:22 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील सर्वच राजकीय नेत्यांसाठी प्रतिष्ठेची असलेल्या धडगाव नगरपंचायत निवडणुकीचे ( Dhadgaon Local Body Election 2022 ) निकाल जाहीर झाला आहे. या निकालात शिवसेनेने आपली सत्ता कायम ठेवली तर धडगाव नगरपंचायत निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी पाडवी ( Minister K. C. Padwi ) यांना जोरदार धक्का बसला आहे. त्याच बरोबर भाजपाचे खासदार व आमदार यांनादेखील या निकालाचा धक्का बसला आहे.

धडगाव नगरपंचायतीत शिवसेनेची सत्ता कायम; आदिवासी विकास मंत्र्यांना धक्का

तिन्ही प्रमुख पक्षाच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

धडगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना व भाजपाच्या सर्वच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री के. सी. पाडवी, भाजपाच्या खासदार डॉक्टर हिना गावित ( MP Heena Gawit ) व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित ( MLA Vijaykumar Gawit ) त्याचबरोबर शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी ( Ex MLA Chandrakant Raghuvanshi ) यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणुकीत शिवसेनेचा विजय झाल्याने काँग्रेस व भाजपला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने तीन जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस चे 5 जागांचे नुकसान झाले आहे.

शिवसेनेने जिंकल्या १३ जागा

शिवसेनेने 13 जागा जिंकल्या आहेत. या निवडणुकीत त्यांच्या 5 जागा वाढल्या आहेत. तर भाजपाने पहिल्यांदा या नगरपंचायतीमध्ये खाते उघडले आहे. धडगाव नगरपंचायतीची निवडणूक राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. विरोधात खासदार डॉ. हिना गावित आणि शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी स्वतंत्र पॅनल दिले होते. भाजपामुळे झालेल्या तिरंगी लढतीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. सेनेच्या विजयाने सेनेत चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागात काँग्रेसची ताकद कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

धडगाव नगरपंचायत निकाल
एकूण जागा 18
शिवसेना 13
काँग्रेस03
भाजपा 01

वार्ड निहाय विजयी उमेदवार

प्रभाग 1) पावरा ललीता तुकाराम (भाजपा),

प्रभाग 2) पावरा ललीता संजय (काँग्रेस),

प्रभाग ३) पावरा कल्याणसिंग भरतसिंग (काँग्रेस),

प्रभाग ४) पराडके भरतसिंग पारशी, (शिवसेना),

प्रभाग ५) पावरा रघुनाथ विरसिंग (शिवसेना),

प्रभाग ६) पावरा राजेंद्र गुलाबसिंग (शिवसेना),

प्रभाग ७) सरदार पारशी पावरा (शिवसेना),

प्रभाग ८) ब्राम्हणे विजय छगन (शिवसेना),

प्रभाग ९) चव्हाण भावना मिनेश (शिवसेना),

प्रभाग १० ) पावरा कविता राकेश (शिवसेना),

प्रभाग ११ ) पराडके दिपीका जामसिंग ( शिवसेना ),

प्रभाग १२) पावरा धनसिंग दादला (शिवसेना),

प्रभाग १३) पावरा पुरुषोत्तम दिलवरसिंग (शिवसेना),

प्रभाग १४ ) पावरा गिरजा अंबाजी (काँग्रेस),

प्रभाग १५) पावरा सुनंदाबाई हेमंत (शिवसेना),

प्रभाग 16) वळवी विद्या शिवराम (शिवसेना),

प्रभाग १७ ) पराडके शर्मिला जमसर ( शिवसेना ).

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.