ETV Bharat / state

कोरोनाच्या सवटाखाली शाळांना सुरुवात, शिक्षणाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद - nandurbar District School Latest News

सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या, मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. अत्यंत कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्या. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सोमवारी अनेक शाळेंना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

School started in nandurbar
नंदुरबारमध्ये शाळा सुरू
author img

By

Published : Nov 24, 2020, 6:27 PM IST

नंदुरबार - सोमवारी नंदुरबार जिल्ह्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या, मात्र विद्यार्थी आणि पालकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली. अत्यंत कमी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्या. शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी सोमवारी अनेक शाळेंना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

शिक्षणाधिकाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व्यवस्थापनाकडून खबरदारी

सरकारने शाळा सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर शाळेच्या सर्व खोल्यांची स्वच्छता करण्यात आली. तसेच शाळेत विद्यार्थांना मास्क घालने सक्तीचे करण्यात आले आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना मास्कशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येत नाही. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांची थर्मल स्कॅनिंग देखील करण्यात येत आहे. थर्मल स्कॅनिंगसाठी गेटवर कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांची शाळेला भेट

शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी शहरातील विविध शाळांना भेट दिली. यावेळी त्यांनी काही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवले, तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशी काळजी घ्यायची, नियमांचे पालन कसे करायचे याचे मार्गदर्शन केले.

शाळेत विद्यार्थांची अनुपस्थिती

कोरोनाच्या सावटाखाली शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र होते. काही शाळांमध्ये अगदी एक ते दोन विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.दरम्यान शाळेच्या आवारामध्ये कोरोनाबाबत घ्यावयाच्या काळजीचे फलक देखील लावण्यात आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.