ETV Bharat / state

नवापूर स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न; सुविधांचा अभाव, पालिकेचे दुर्लक्ष - Navapur Cemetery News

नवापूर शहरातील एकमेव स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न झाली आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या तीन महिन्यांपासून लाकडे अस्तव्यस्त अवस्थेत पडलेली आहे. बहुतांश ठिकाणी हौद आहेत. पण, त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि लाईटही नादुरुस्त आहेत.

नवापूर स्मशानभूमीतील दृश्य
author img

By

Published : Nov 12, 2019, 3:30 PM IST

नंदुरबार- नवापूर शहरातील स्मशानभूमीत जळावू लाकडे ठेवल्याने अंतिम संस्कार करणारे नागरिकांना अडचण निर्माण होत आहे. त्याचबरोबर स्मशानभूमीत मूलभूत सुविधा नसल्याने अंतिम संस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना गैरसोय होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याबाबत उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे.

नवापूर स्मशानभूमीतील दृश्य

नवापूर शहरातील एकमेव स्मशानभूमीची अवस्था मरणासन्न झाली आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या तीन महिन्यांपासून लाकडे अस्तव्यस्त अवस्थेत पडलेली आहे. बहुतांश ठिकाणी हौद आहेत. पण, त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि लाईटही नादुरुस्त आहेत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो.

पावसाळ्यात तर स्मशानभूमीची अवस्था आणखीच भयंकर होते. पाऊस पडल्यावर स्मशानभूमीत बसण्याच्या ठिकाणी पाणी गळते. मैदानात पाणी साचते. मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी नगरपालिका घेत नसल्यामुळे स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन दिलासा द्यावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

हेही वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील दोन प्रमुख महामार्गांची दुरवस्था; नागरिकांच्या जिवाशी खेळ

Intro:नंदुरबार - नवापूर शहरातील स्मशानभूमीत जळावू लाकडे ठेवल्याने अंतिम संस्कार करणारे नागरिकांनी अडचण निर्माण होत असल्याने नवापूर नगर पालिकेचे प्रशासन तीन महिन्यांपासून जळावू लाकडे पडून असल्याने नागरिकांना अंतिम संस्कार करण्याची वेळी अडचणीचा सामना करावा लागत आहे. याबाबत पालिका प्रशासन उपाययोजना करणे गरजेचे आहे.Body:नवापूर शहरातील एकमेव स्मशानभूमींची अवस्था मरणासन्न झाली आहे. श्रद्धांजली वाहण्यासाठी मोकळ्या जागी गेल्या तीन महिने पासून लाकडे अस्तवस्थ अवस्थेत पडलेली आहे. बहुतांश ठिकाणी हौद आहेत; पण त्यात भरण्यासाठी पाण्याचा पुरवठाच होत नाही. अस्थी ठेवण्यासाठी लॉकर्स नाहीत आणि संध्याकाळी लावण्यासाठी लाईटही नादुरुस्त आहेत. स्मशानभूमीत येणारे लोक आधीच दु:खी असतात. अशा वेळी स्मशानभूमीतील गैरसोयींमुळे त्रास झाल्यास त्यांचा संताप होतो.पावसाळ्यात तर स्मशानभूमींची अवस्था आणखीच भयंकर होते. काही स्मशानभूमीत तर पाऊस पडल्यावर बसण्याची ठिकाणी पाणी गळते. मैदानात पाणी साचते. मूलभूत सुविधा पुरवण्याची तसदी नगरपालिका घेत नसल्यामुळे या स्मशानभूमी अवस्था मरणासन्न झाली आहे. Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.