ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा परिषदेवर युवापर्व; काँग्रेस-सेनेची सत्ता स्थापन

author img

By

Published : Jan 18, 2020, 12:24 PM IST

Updated : Jan 18, 2020, 1:38 PM IST

काँग्रेसच्या अ‍ॅड. सीमा वळवी या नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या असून शिवसेनेचे अ‍ॅड. राम चंद्रकांत रघुवंशी हे उपाध्यक्ष झाले आहेत.

nandurbar-zp-president-election
अ‍ॅड. सीमा वळवी , अ‍ॅड. राम चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार - जिल्हा परिषदेचा सत्ता समीकरणाचा तिढा अखेर सुटला असून नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाआघाडीने झेंडा रोवला आहे. राज्याच्या राजकारणातील या महत्त्वाच्या लढाईत भाजपच्या उमेदवारांसह सर्व सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. सीमा वळवी यांना मतदान केल्याने एक नवीनच सत्ता समीकरण समोर येऊ पाहत आहे.

नंदुरबार जिल्हा परिषदेवर युवापर्व; काँग्रेस-सेनेची सत्ता स्थापन

हेही वाचा - नंदुबार पंचायत समिती निकाल : तीन जागी भाजप, दोन काँग्रेस, तर एकवर सेनेची सत्ता

काँग्रेस आणि भाजपला समसमान अशा 23 जागा मिळाल्यानंतर. शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पक्ष्यांना सेनेच्या सदस्यांची साथ महत्वाची होती. अखेरच्या क्षणाला काँग्रेस आणि सेना एकत्र आल्याने भाजपचे सत्ता समीकरण अयशस्वी झाले. यावेळेस अध्यक्षपदासाठी मतदानाची वेळ जशी जवळ आली तेव्हा भाजपच्या सर्व सदस्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड. सीमा वळवी यांना मतदान केल्याने त्यांना 56 मते मिळाली, तर उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. भाजपचे जयश्री दीपक पाटील आणि शिवसेनेचे अ‍ॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्याशी लढत होती. यात राम रघुवंशी यांना 30 मते मिळाली. तर भाजपच्या उमेदवारांना 26 मते मिळाली. निवडणुकी संदर्भात बोलताना आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी विरोधकांचे आभार मानले आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सीमा वळवी या सर्वात कमी वयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या आहेत. आपण नंदुरबार जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण कुपोषण आरोग्य रस्ते या समस्यांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात असलेले राजकीय अस्थिरतेचे वातावरण आता निवडले असून, महाविकास आघाडीचा दणदणीत विजय नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झाला आहे त्यावरून आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड अधिक मजबूत झाल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे.

माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष -

माजी मंत्री पद्माकर वळवी यांची कन्या असलेल्या सीमा वळवी या नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या आहेत. यापूर्वी काँग्रेसच्या पद्माकर वळवी यांनी 2010 ला आदिवासी मंत्री खाते सांभाळले होते.

हेही वाचा - मकरसंक्रांतीला मांजाने जखमी झालेल्या पक्ष्यांवर उपचार; 'बर्ड कॅम्प'चा उपक्रम

Intro:नंदुरबार -जिल्हा परिषदेचा सत्ता समीकरणाचा तिढा अखेर सुटला असून नंदुरबार जिल्हा परिषदेवर महाआघाडीने आपला झेंडा रोवला आहे. राज्याच्या राजकारणातील या महत्त्वाच्या लढाईत भाजपाचे उमेदवार सह सर्व सदस्यांनी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड.सीमा वळवी यांना मतदान केल्याने एक नवीनच सत्ता समीकरण समोर येऊ पाहत आहे.Body:नंदुरबार जिल्हा परिषदचा निकाल शिवसेना महत्त्वाच्या भूमिकेत होते. काँग्रेस आणि भाजपा ला समान 23 जागा मिळाला होता. सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी दोघी पक्ष्यांना सेनेच्या सदस्यांची सात महत्वाची होती अखेरच्या क्षणाला काँग्रेस आणि सेना एकत्र आल्याने भाजपाचे सत्ता समीकरण चुकली. यावेळेस अध्यक्षपदासाठी मतदानाची वेळ जशी जवळ आली तेव्हा भाजपाच्या सर्व सदस्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे उमेदवार अ‍ॅड.सीमा वळवी यांना मतदान केल्याने त्यांना 56 मते मिळाली तर उपाध्यक्षपदासाठी मतदान घेण्यात आले. भाजपाचे जयश्री दीपक पाटील आणि शिवसेनेचे अ‍ॅड. राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या ही लढत होती. यात राम रघुवंशी यांना 30 मते मिळाली तर भाजपच्या उमेदवारांना 26 मते मिळाली निवडणुकी संदर्भात बोलतांना आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांनी विरोधकांचे हे आभार मानले आहेत.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या सिमा वळवी ह्या सर्वात कमी वयाचा राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. आपण नंदुरबार जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण कुपोषण आरोग्य रस्ते या समस्यांकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी बोलतांना सांगितले.
Byte-
-सीमा वडवी
नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष, नंदुरबार

Conclusion:एकूणच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यात असलेले राजकीय अस्थिरतेचे वातावरण आता निवडले असून महाविकास आघाडीचा दणदणीत विजय नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत झाला आहे त्यावरूनच आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांची जिल्ह्याच्या राजकारणावर पकड अधिक मजबूत झाल्याचे या निवडणुकीवरून दिसून येत आहे.
Last Updated : Jan 18, 2020, 1:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.