नंदुरबार - स्थानिक स्वराज संस्थांचे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा जास्त जात असल्याने धुळ्यातील किरण पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर निर्णय देत नाही जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दिनांक 18 पासून फॉर्म भरण्याची सुरुवात तर दिनांक 7 ला मतदान व दिनांक 8 ला मतमोजणी असा कार्यक्रम असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा... अहमदनगर : राजकीय वादातून निवृत्त सैनिकाने केलेल्या गोळीबारात सरपंच ठार, नांदूर निंबादैत्य गावातील घटना
या निवडणुकीसाठी 10 लाख 4 हजार 873 मतदार असून 7 जानेवारीला मतदानासाठी 1 हजार 229 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. आज बुधवारपासून इच्छुक उमेदवारांना नामांकन दाखल करण्यात येणार असून 23 डिसेंबर ही अखेरची मुदत राहणार आहे. निवडणुक प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी 6 हजार 800 कर्मचार्यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, धनंजय गोगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा... आपल्याच सरकारविरोधात भाजप आमदारांचे आंदोलन; विरोधकही झाले सहभागी
नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी पत्रपरिषद घेण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्यासह निवडणूक शाखेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेसह अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार व नवापूर या सहा पंचायत समितींसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सार्वत्रिक निवडणूक घेण्यात येत आहे.
हेही वाचा.. शिवस्मारक घोटाळ्यातून जनभावनांशी खेळणाऱ्या भाजपचा अनैतिक चेहरा उघड; सचिन सावंतांची टीका
नंदुरबार जिल्हा परिषदेचे 56 गट असून त्यात अक्कलकुवा तालुक्यात 10, अक्राणीत 7, तळोद्यात 5, शहाद्यात 14, नंदुरबारात 10, नवापूरात 10 असे तालुकानिहाय गट आहेत. तर सहा पंचायत समितींचे 112 गण असून अक्कलकुवा पंचायत समितीचे 20, अक्राणी पंचायत समितीचे 14, तळोदा पंचायत समितीचे 10, शहादा पंचायत समितीचे 28, नंदुरबार पंचायत समितीचे 20, नवापूर पंचायत समितीचे 20 असे गण आहेत. जिल्हा परिषद गट व गण मिळुन 10 लाख 4 हजार 873 इतके मतदार असून त्यात 5 लाख 1 हजार 306 महिला मतदार आणि 5 लाख 3 हजार 560 पुरूष मतदार आहेत. या निवडणुकीसाठी 1 हजार 229 मतदान केंद्र असून अक्कलकुव्यात 205, अक्राणीत 149, तळोद्यात 111, शहाद्यात 308, नंदुरबारात 224, नवापूरात 232 अशी मतदान केंद्रे असणार आहेत. दि.18 डिसेंबरपासून नामांकन दाखलच्या प्रक्रियेला सुरुवात होत असुन दि.23 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सुरुवातीला इच्छुक उमेदवारांना निवडणुक आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरावा लागेल. त्यानंतर संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे उमेदवारी दाखल करावी लागणार आहे. दि.24 डिसेंबरला अर्जांची छाननी होणार असून 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. तर अपिल असणार्या अर्जांची माघारी घेण्याची मुदत 1 जानेवारी आहे. तसेच दि.7 जानेवारीला मतदान घेण्यात येणार असून 8 जानेवारीला मतमोजणी प्रक्रिया होणार आहे.
हेही वाचा... रितेशच्या वाढदिवशी जेनेलियाची रोमॅन्टिक पोस्ट, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान यंत्राद्वारे मतदान प्रक्रिया घेण्यात येणार असून त्यातुन मात्र व्हीव्हीपॅट वगळण्यात आले आहे. निवडणूकीसाठी जिल्ह्यात आचारसंहिता लागु असून आचारसंहितेचे पालन करावे, असेही आवाहन उपजिल्हाधिकारी गोगटे व निकम यांनी केले. गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषद निवडणूकीची रणधूमाळी सुरू असल्याने आज बुधवारपासून खर्याअर्थाने ग्रामीण भागात निवडणुकीची रणधूमाळी रंगणार आहे.