ETV Bharat / state

दिलासादायक ! नंदुरबार जिल्हा 100% कोरोनामुक्त

गेल्या पंधरा दिवसात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नसून जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना बाधित उपचार घेत नसल्याने आता तब्बल साडे चारेशहून अधिक बेड हे रिकामे आहेत.

नंदुरबार
नंदुरबार
author img

By

Published : Aug 13, 2021, 10:20 PM IST

Updated : Aug 13, 2021, 10:35 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही आहे. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये कोरोना ॲक्टिव्ह रुग्णसंख्या शून्य झाल्याने आणि शेवटच्या कोरोना बाधितांचा मृत्यू होवून जवळपास पन्नास दिवसांहून अधिकचा कालावधी उलटल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

नंदुरबार जिल्हा 100% कोरोनामुक्त

जिल्ह्यातील आरोग्या सुविधांच्या अभावांवर मात

आरोग्याच्या अतिशय तोकड्या सुविधा आणि त्यातही अपुरे मनुष्यबळ म्हणुन नंदुरबारची ओळख आहे. त्यामुळेच कोरोनाच्या लाटेत नंदुरबारमध्ये प्रचंड हालअपेष्टा येण्याचे संकेत वर्तवल्या जात होते. मार्च एप्रिल महिन्यात तसेच झाले. नागरिकांना जिल्ह्यात बेड आणि ऑक्सिजन मिळत नसल्याने कोरोना बाधितांचे प्रचंड हालही झाले. मात्र यानंतर अवघ्या तीनच महिन्यात नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता शुन्यावर पोहचली आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोना अहवाल शून्य

गेल्या पंधरा दिवसात एकही कोरोना बाधित रूग्ण आढळून आला नसून जिल्हा सामान्य रुग्णालयात एकही कोरोना बाधित उपचार घेत नसल्याने आता तब्बल साडे चारेशहून अधिक बेड हे रिकामे आहेत. यामुळे आरोग्य यंत्रनेवरचा ताण काहीसा कमी झाला असून याबाबत एकत्रीत परिश्रमाची फलश्रुती असल्याचे यंत्रनेला वाटत आहे.

सहाही तालुके कोरोना संसर्ग मुक्त

जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात गेल्या चाळीस दिवसांपासुन एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर दुसरीकडे शहादा, अक्कलकुवा, नवापुर आणि तळोदा, नंदुरबार सारखे तालुक्यांमधील अँक्टीव्ह रूग्णाची संख्या ही शुन्य झाली आहे.

50 दिवसात एकही बाधिताचा मृत्यू नाही

नंदुरबार जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस व एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दररोज 25 पेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत होता. मात्र जिल्हा प्रशासनाच्या व आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नामुळे मृत्यूसंख्येवर आळा घालण्यात यश आले. विशेष म्हणजे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या आता पन्नास दिवसांहून अधिकचा कालावधी उलटला आहे. त्यामुळेच आरोग्य यंत्रनेने आता आपले सारे लक्ष नियमीत आजार आणि त्यावरच्या औषधोपचारांकडे केंद्रीत केले आहे.

तालुका बाधित मृत्यू सक्रिय रुग्ण
नंदुरबार 16022 388 0
शहादा 11686 235 0
नवापुर 4145 178 0
तळोदा 3780 099 0
अक्कलकुवा 1204 027 0

धडगाव 836 023 0
एकूण 37700 950 0

हेही वाचा- राज्यपाल बांधिल नाहीत, त्यांना निर्देश देऊ शकत नाही, 12 आमदारांबाबत लवकर निर्णय घ्यावा- न्यायालय

Last Updated : Aug 13, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.