ETV Bharat / state

टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठा करताना पालिका कर्मचाऱ्याला मारहाण

पालिका कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याप्रकरणी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे.

author img

By

Published : Jun 15, 2019, 10:37 PM IST

नंदुरबार

नंदुरबार - नवापूर शहरात पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने नगर पालिका प्रशासन अग्नीशमन दलाच्या बंबाने टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवत आहे. दरम्यान, पाणी पुरवठा केला जात असताना पालिका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

नंदुरबार

नवापूर पालिकेचे नगरसेवक हारूण खाटीक यांचा फोन आल्याने अग्नीशमन दलाचा बंब नारायणपूर रस्त्यावर पाणी वाटप करण्यासाठी पाठवण्यात आला. टंचाईग्रस्त भागात अग्नीशमन दलाचे चालक राजेश गावित व फायरमेन भास्कर भालेराव हे दोन कर्मचारी गेले. तेथील २० ते २५ महिलांना पाणी वाटप करत असताना नगरसेवक हारूण खाटीक यांचा भाऊ रफिक पैलवानसोबत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांना, पाणी भरत असलेल्या महिलांना बाजूला करत आमच्या घरी पाणी भरण्यासाठी अग्नीशमन बंबाची गाडी घ्यावी, असा आग्रह केला. फायरमेन भास्कर एकनाथ भालेराव यांनी त्याला विरोध केला, बंब एकासाठी नसून सर्वांसाठी आहे. आधी महिलांना पाणी भरू द्यावे नंतर गाडी आणतो. परंतु, फायरमेनचे न ऐकता दादागिरी करत शिवीगाळ करून त्यांच्या कानशीलात लगावली.

पालिका कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्याप्रकरणी कर्मचारी वर्गात नाराजीचा सूर आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी हा प्रकार वरिष्ठांचा कानावर घालून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले. उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Intro:Anchor :- नवापूर शहरातील पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाल्याने नगर पालिका प्रशासन अग्नीशमन दलाच्या बंबाने टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवले जात असतांना पालिका कर्मचारीला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. Body:Vo नवापूर पालिकेचे नगरसेवक हारूण खाटीक यांच्या फोन आल्याने अग्नीशमन दलाचा बंबा नारायणपुर रस्त्यावर पाणी वाटप करण्यासाठी पाठवण्यात आला. टंचाईग्रस्त भागात अग्नीशमन दलाचे चालक राजेश गावित व फायरमेन भास्कर भालेराव हे दोन कर्मचारी गेले. तेथील २०-२५ महिलांना पाणी वाटप करीत असताना नगरसेवक हारूण खाटीक यांच्या भाऊ रफिक पैलवान सोबत असलेल्या एक अनोळखी व्यक्तीने नगर पालिकेचे कर्मचारी यांना सांगितले की, पाणी भरत असलेल्या महिला बाजूला करीत आमच्या घरी पाणी भरण्यासाठी अग्नीशमन बंबाची गाडी घ्यावी असा आग्रह केला. फायरमेन भास्कर एकनाथ भालेराव यांनी विरोध केला बंबा एकासाठी नसून सर्वांसाठी आहे. आधी महिलांना पाणी भरू द्यावा नंतर गाडी आणतो. परंतू फायरमेनचे न ऐकता दादागिरी करत शिवीगाळ करून कानशीलता मारले.
Conclusion:पालिका कर्मचारी कर्तव्य बजावत असताना मारहाण केल्या प्रकरणी कर्मचारी वर्गात नाराजीचा सुर आहे. संबंधित कर्मचा-यांनी संबंधित प्रकार वरिष्ठांचा कानावर टाकून पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले.उशीरपर्यत गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू होते.

Byte भालेराव मारहाण झालेला कर्मचारी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.