नंदुरबार- भाजपच्या वतीने शहादा येथे 'कॉफी विथ यूथ' या संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवमतदारांशी संपर्क साधण्यासाठी भाजपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी नवमतदारांशी संवाद साधला व त्यांना राजकारणात येण्याचे आवाहन केले.
युवकांनी राजकारणात येऊ नये, असे म्हटले जाते. तसेच मलाही वाटत होते. मात्र, मी राजकारणात सक्रिय झाली. राजकारणाच्या माध्यमातून आपन समाजसेवा आणि राष्ट्रहित साधत असतो. त्यामुळे तरुणांनी मोठ्या प्रमाणात राजकारणात यावे, असे आवाहन खासदार रक्षा खडसे यांनी शहादा येथे नवमतदारांशी बोलताना केले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग उपस्थित होता.
हेही वाचा- नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघासाठी 36 उमेदवारांचे अर्ज वैध