नंदुरबार - भारतीय जनता पक्षाकडून विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज सादर केला आहे.
नंदुरबार शहरातून भव्य रॅली काढत डॉ. हिना गावित यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थिती लावली होती. गिरीश महाजन यांनी डॉ. हिना गावित आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मोठ्या मतांनी निवडून येणार आहेत, असे म्हटले.