ETV Bharat / state

'कोरोना'चा रुग्ण आढळल्याची बनावट पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत; अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल - बनावट पोस्ट

राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ब्रेकींग न्युजची बनावट पोस्ट तयार करुन ती सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या अज्ञाताविरुध्द अक्कलकुवामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच अक्कलकुवामध्ये कोरोनाचा कोणताही रूग्ण नसल्याचा खुलासा तहसिलदारांनी केला आहे.

akkalkuva police station
अक्कलकुवा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 18, 2020, 12:44 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा येथे कोरोनाचा रूग्ण आढळल्याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ब्रेकींग न्युजची बनावट पोस्ट तयार करुन सोशल मीडियावर प्रसारित करणार्‍या एका अज्ञाताविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाची अफवा पसरविणार्‍या संशयिताचा अक्कलकुवा पोलीस शोध घेत आहेत. तसेच सदर पोस्ट प्रसारीत होताच अक्कलकुव्याचे तहसिलदारांसह संबंधित विभागप्रमुखांनी पत्रकार परिषद घेवून अक्कलकुवा शहरात व तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याचा खुलासा केला आहे.

अक्कलकुवात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची बनावट पोस्ट सोशल मीडियावर प्रसारीत ; अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल

हेही वाचा... CORONA : ...'या' कारणामुळे झाला मुंबईच्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू

कोरोना विषाणु या जीवघेण्या आजाराशी दोन हात करण्यासाठी शासनाकडून जनजागृतीचे निर्देश व अफवा पसरविणार्‍यांवर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. अक्कलकुवा शहरासह तालुक्यात प्रशासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता घेण्यात येत आहे. याच दरम्यान, एका अज्ञाताने अक्कलकुव्यात कोरोनाचा रूग्ण आढळल्याबाबत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या ब्रेकिंग न्युजची बनावट पोस्ट तयार करुन समाज माध्यमांवर प्रसारित केली. यामुळे अक्कलकुव्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. कोरोनाचा रूग्ण आढळल्याच्या बनावट पोस्ट प्रसारित होताच प्रशासनानेही शहानिशा केली. परंतु अक्कलकुवा शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रूग्ण नसतांना अफवा पसरवणारी पोस्ट वृत्तवाहिनीच्या नावे प्रसारित करणार्‍या अज्ञाताविरुध्द अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या त्या आरोपीचा शोध घेत आहेत.

कोरोनाचा रूग्ण नसल्याचा खुलासा करण्यासाठी अक्कलकुवा तहसिल कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रभारी तहसिलदार विजय कचवे म्हणाले की, 'अक्कलकुवा शहरात कोरोनाचा रूग्ण असल्याबाबत सोशल मीडियामध्ये अफवा पसरवली जात आहे. सदरच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये कोणतेही तथ्य नसून नागरिकांनी अफवांवर विश्‍वास ठेवु नये. कोरोना प्रतिबंधासाठी अक्कलकुवा शहर व तालुक्यात खबरदारी म्हणून प्रशासन सतर्क असल्याचे' त्यांनी सांगितले. तसेच कोरोना आजाराविषयी अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे म्हणाले.

अक्कलकुव्यात रूग्ण आढळल्याची बनावट पोस्ट प्रसारित करणार्‍या अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. कोणीही बेजबाबदारपणे कोरोनाच्या अफवेबाबत वक्तव्य केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अक्कलकुवा तालुक्यात कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता घेण्यात आली असून आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी स्वप्निल वानखेडे यांनी दिली. अक्कलकुवा येथील रूग्णालयात विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली असून आरोग्य यंत्रणाही सज्ज असल्याचे ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पवार यांनी सांगितले. अक्कलकुवा शहरातील शाळा, महाविद्यालय व अंगणवाड्यांना सुटी जाहीर करण्यात आली आहे, असे गटविकास अधिकारी सी.के.माळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर तहसिलदार विजय कचवे, गटविकास अधिकारी सी.के.माळी, पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे, बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश मान्टे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्निल मालखेडे, डॉ.पवार यांनी रूग्णालयातील विशेष कक्षाची पाहणी करुन उपाययोजनांची माहिती जाणून घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.