नंदुरबार - जिल्ह्यात मंगळवारी (दि.11 ऑगस्ट) रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार 71 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली. तर दिवसभरात 51 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
प्राप्त अहवालानुसार शहादा तालुक्यात 53, नंदुरबार तालुक्यात 11, तळोदा तालुक्यातील 5 तर नवापूर व शिंदखेडा तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 930 वर पोहोचली आहे.
मंगळवारी रात्री उशिरा आलेल्या 174 अहवालांपैकी 71 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर 51 बाधितांनी कोरोनावर मात करुन संसर्गमुक्त झाले. तर अहवाल प्राप्त होईपर्यंत जिल्ह्यातील मृतांची संख्या 47 इतकी झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढतच चालल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नंदुरबार तालुक्यातील टोकरतलाव येथील 1, रनाळा येथील 1, जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील 1, वालखुंट (ता. नवापूर) येथील 1, काकाशेट गल्ली तळोदा येथील 1, शिंदखेडा (जि. धुळे) येथील 1, धुळे नाका रोड नंदुरबार येथील 1, सिंधी कॉलनी नंदुरबार येथील 1, गायत्री नगर नंदुरबार येथील 2, भोई गल्ली तळोदा येथील 1, म्हाडा कॉलनी नंदुरबार येथील 1, वाणी गल्ली तळोदा येथील 1, हरकलाल नगर तळोदा येथील 1, अंबादास पार्क तळोदा येथील 1, कलसाडी (ता.शहादा) येथील 6, दिनदयाल नगर शहादा येथील 1, गांधीनगर शहादा येथील 1, परिवर्धा (ता.शहादा) येथील 1, डोंगरगाव (ता.शहादा) येथील 4, एचडीएफसी बँक शहादा येथील 2, कोंढावळ (ता.शहादा) येथील 2, परिमल कॉलनी शहादा येथील 1, जुनी पोस्ट गल्ली शहादा येथील 8, तांबाळी गल्ली शहादा येथील 1, क्रांती चौक शहादा येथील 1, कल्पना नगर शहादा येथील 1, गौरीनंदन कॉलनी शहादा येथील 3, सोनार गल्ली शहादा येथील 1, रॉयल अपार्टमेंट शहादा येथील 1, खोलगल्ली शहादा येथील 2, कुबेर नगर शहादा येथील 1, डोंगरगाव रोड शहादा येथील 2, विकास कॉलनी शहादा येथील 1, शिवाजी नगर शहादा येथील 6, मीरा नगर शहादा येथील 1, गोरखनाथ मंदिर तोरणमाळ येथील 1, फिल्टर ऑफीस शहादा येथील 4, शिवम सिटी शहादा येथील 1, कंजरवाडा नंदुरबार येथील 3 रुग्णांचा समावेश आहे.