ETV Bharat / state

नांदेडमध्ये महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या; मृतदेह फेकला नाल्यात - physical abusing

मुक्ता शुक्रवारी मांडवा येथील आश्रम शाळेत मुलीला सोडायला गेली होती.

नांदेडमध्ये महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या
author img

By

Published : Feb 23, 2019, 9:49 PM IST

नांदेड - किनवट शहरालगतच्या मांडवा रोडवरील नाल्यात एका महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकिस आली आहे. मुक्ता इंगळे असे या महिलेचे नाव असून ती माळबोरगाव येथील रहिवासी आहे.

नांदेडमध्ये महिलेवर अत्याचार करून निर्घृण हत्या

मुक्ता पुंडलीक इंगळे हिचा विवाह यवतमाळमधील पुसद तालुक्यातील लोणदरी येथील विठ्ठल झाडे यांच्याशी झाला होता. पाच वर्षाआधी मुक्ता इंगळेचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर त्या २ मुलींना घेऊन माहेरीच राहत होत्या. मुक्ता शुक्रवारी मांडवा येथील आश्रम शाळेत मुलीला सोडायला गेली होती. परत येत असताना किनवट शहरालगतच्या नाल्यात तिच्यावर बलात्कार करून तिची दगडाने डोके ठेचून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांना शवविच्छेदन प्रक्रियेनंतर गुन्ह्याची नोंद केली आहे. या संपुर्ण घटनेचा तपास किनवट पोलीस करत आहेत.

Intro:नांदेड - महिलेवर अत्याचार करून,निर्घृणपणे केली हत्या.
नांदेड : किनवट तालुक्यातील माळबोरगांव येथिल मुक्ता इंगळे या महिलेचा किनवट शहरालगतच्या मांडवा रोडवरील नाल्यात तिच्यावर बलात्कार करुन दगडाने ठेचून निर्घून हत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकिस आली आहे.
मुक्ता इंगळे शुक्रवारी मांडवा येथिल आश्रम शाळेत मुलिला सोडून ती घरी परतली नसल्याचे सांगण्यात आले आहे. सदर घटनेची किनवट पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.Body:
माळबोरगांव येथिल मुक्ता पिता पुंडलीक इंगळे हिचा विवाह विदर्भातील पुसद तालुक्यातील लोनदरी येथिल विठ्ठल झाडे यांच्याशी झाला होता. दोन मुलिनंतर मुक्ता इंगळेचा पतीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर तिने दोन मुलिंना घेऊन पाच वर्षापासून माहेरी राहात होती. तिची पायल नावाची मुलगी ही किनवट तालुक्यांतील मांडवा येथिल आश्रम शाळेत इयत्ता दुसरीत शिकत आहे. त्या पायलला शाळेत सोडण्यासाठी मुक्ता ही शुक्रवारी मांडव्याला दुपारी गेली होती. तेथून सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान ती किनवटकडे परतली परंतु माळबोरगांवला पोहोचली नाही. दरम्यान रस्त्यातच किनवट ते मांडवा जाणा-या मुख्य मार्गावरील किनवट शहरालगतच्या नाल्यात तिच्यावर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे दगडाने डोके ठेचून हत्या केल्याची ह्रदय हेलाऊन टाकणारी घटना घडवल्या गेली आहे. Conclusion: सदर महिलेच्या हत्तेची खबर शनिवारी दुपारी किनवट शहरात पसरली. किनवट पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक दिलीप तिडके यांनी फौजफाटा घेऊन घटनास्थळ गाठून स्थळ पंचनामा केला. उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन प्रक्रियेनंतर गुन्ह्याची नोंद केल्याचे वृत्त आहे. मुक्ताला आणि तिच्या पायलला शाळेत सोडण्यापासून ते किनवटकडे परत येईपर्यंत ज्या ज्या व्यक्ती त्या मुक्ताच्या सोबत होते त्याच व्यक्ती या घटनेस कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपुर्ण घटनेचा तपास किनवट पोलीस करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.