नांदेड : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब आज तीर्थक्षेत्र माहूर इथल्या रेणुका मातेचे दर्शन घेतले. यावेळी गडकरी कुटुंबाच्या हस्ते मातेचा अभिषेक, आरती करण्यात आली. तब्बल दोन तासांहून अधिक काळ गडकरी कुटुंबाने गडावर मातेची आराधना केली. यावेळी त्यांच्या सोबत संपूर्ण गडकरी कुटुंब हजर होते.
गडकरी यांच्या हस्ते लिफ्टच्या कामाचे भूमिपूजन : नांदेड जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र माहूर गडावर जाण्यासाठी लिफ्टच्या कामाचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. एकावन्न कोटी रुपये खर्चून गडावर जाण्यासाठी अत्याधुनिक लिफ्टची उभारणी करण्यात येणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आज माहूर मध्ये पार पडला. या कार्यक्रमाला स्थानिक खासदार हेमंत पाटील यांच्यासह नांदेड, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा : महाराष्ट्रातील शक्तीपिठापैकी एक असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माहूर गडावर लिफ्टसह स्कायवॉकची सुविधा अवघ्या १८ महिन्यात भक्तांना उपलब्ध होणार आहे. वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक, भक्तांसाठी अत्यावश्यक असलेल्या या सुविधेच्या निर्मितीचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते शनिवार २० मे रोजी संपन्न उद्घाटन झाले.
- अशी आहेत प्रकल्पाची ठळक वैशिष्टे
- स्काय वॉकची लांबी ७० मीटर तर रुंदी १५ मीटर असेल.
- लोवर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची २५ मीटर असून एकुण ४ लिफ्टची २० प्रवाशी क्षमता असेल.
- अपर स्टेशन लिफ्ट टॉवरची उंची २३ मीटर असून एकुण ४ लिफ्टची २० प्रवाशी क्षमता असेल. या प्रकल्पाची वाहतूक क्षमता एकावेळेस ८० प्रवासी चढणे, उतरण्याची असेल.
- या प्रकल्पामध्ये एकुण ३२ गाळे, प्रसाधन गृह, सुरक्षा कर्मचारी कक्ष, उपहार गृह उपलब्ध असतील.
- मंदिर प्रशासनासाठी स्वतंत्र प्रशासकीय कार्यालय राहील. दर्शनीय लॉबी, भविष्यातील गरजेनुसार ट्रॅव्हेलेटरचे प्रयोजनासह राहील.
सोलार सिस्टीम प्लांट, भूमिगत पाण्याच्या टाकीची क्षमता २ लाख लिटरची असेल.
हेही वाचा -
- Maharashtra Ministry Expansion : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्ली दरबारी, मंत्रिमंडळाच्या विस्ताराला हिरवा कंदील ?
- Aryan Khan Drug Case : सीबीआय चौकशीसाठी समीर वानखेडे कार्यालयात हजर, कॉर्डीलिया क्रूझ प्रकरणाला नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता
- Devendra Fadnavis Meet Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांनी घेतली आशिष देशमुखांची भेट, भाजप प्रवेशाची चर्चा