ETV Bharat / state

कापसाचे बनावट बियाणे विक्री करताना दोघांना अटक...! - नांदेड गुन्हे बातमी

नांदेड जिल्ह्यातील तामसा परिसरात ग्रो हॉनी फोरजी नावाचे कपाशीचे बनावट बियाणे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच हदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी सापळा रचून तळेगाव फाटा येथे मोटारसायकल स्वारावर छापा टाकून 30 हजार रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले आहे.

कापूस
कापूस
author img

By

Published : Jun 14, 2021, 9:20 PM IST

नांदेड - जिल्ह्यातील तामसा परिसरात ग्रो हॉनी फोरजी नावाचे कपाशीचे बनावट बियाणे विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळताच हदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकाऱ्यांनी सापळा रचून तळेगाव फाटा येथे मोटारसायकल स्वारावर छापा टाकून 30 हजार रुपयांचे बनावट बियाणे जप्त केले आहे. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना रविवारी (दि. 13 जून) अटक केली आहे.

बोगस बियाण्याच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांना आमिष

नक्षत्राचा पाऊस जोरदार होत असल्यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीत आहे. तामसा (ता.हदगाव) या भागात मोठ्या प्रमाणात बोगस बियाणांची विक्री होत आहे. शेतकऱ्यांना वेगवेगळे अमिष दाखवून बियाणे विकण्याचे प्रकार घडत आहेत.

ग्रो हॉनी फोरजी नावाचे कपासीचे बोगस बियाणे

तामसापासून जवळ असलेल्या तळेगाव शिवारात काशिनाथ विश्वनाथ कंठीले (रा.अहमदनगर) व मारोती नागोराव पवार (रा. शिवणी, ता. हदगाव) हे दोघे मोटारसायकल (क्र एम. एच. 37 3228) यावर तळेगाव शिवारात ग्रो हॉनी फोरजी नावाचे कपासीचे बोगस बियाणे 450 ग्रॅमचे पॉकिट 1 हजार रुपये प्रमाणे उत्कृष्ट बियाणे असल्याचे सांगून विक्री करीत होते. सदर बियाणांच्या पॉकेटवर कोणत्याही प्रकारचे उत्पादक, वितरक यांचे नाव नसलेले संशयीत व शासन मान्यता नसलेले बनावट बियाणे शेतकऱ्यांना विक्री करण्यात येत होते.

फसवणुकीचा गुन्हा दाखल

हदगाव पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रकाश जाधव यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून सापळा रचला व बोगस बियाणे विक्रीवर छापा टाकून शेतकऱ्यांची लुट थांबविली. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस; विष्णूपूरी धरणाचा एक दरवाजा उघडला...!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.