ETV Bharat / state

हरियाणात पकडलेल्या चारही दहशतवाद्यांनी केली होती नांदेडसह विविध भागात 'रेकी'

हरयाणातील कर्नाल येथे पोलिसांनी स्फोटकासह पकडलेले चारही दहशतवादी मार्च महिन्यात चार दिवस नांदेड मुक्कामी होते. त्यानंतर बिदरमार्गे गोव्याला गेले होते. कुख्यात हरविंदरसिंघ रिंदाचे हे चार दहशतवादी साथीदार असून पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा ते नांदेडला आणणार होते. त्यानंतर आता हैदराबाद, बिदर, गोवा, नांदेड भागाची रेकी केल्याची माहिती पुढे येत आहे.

हरविंदरसिंघ रिंदा
हरविंदरसिंघ रिंदा
author img

By

Published : May 10, 2022, 10:32 AM IST

Updated : May 10, 2022, 1:44 PM IST

नांदेड - हरविंदरसिंघ रिंदा या कुख्यात बब्बर खालसा या संघटनेतील चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. हरयाणातील कर्नाल येथे पोलिसांनी स्फोटकासह पकडलेले चारही दहशतवादी मार्च महिन्यात चार दिवस नांदेड मुक्कामी होते. त्यानंतर बिदरमार्गे गोव्याला गेले होते. कुख्यात हरविंदरसिंघ रिंदाचे हे चार दहशतवादी साथीदार असून पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा ते नांदेडला आणणार होते. त्यानंतर आता हैदराबाद, बिदर, गोवा, नांदेड भागाची रेकी केल्याची माहिती पुढे येत आहे. सदरील माहिती पुढे आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दहशतवाद्यांची नांदेडसह विविध भागात 'रेकी'

नांदेड व आदिलाबाद टार्गेटवर - बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेले कुख्यात गुन्हेगार हरविंदरसिंग रिंदा याचे चार साथीदार दहशतवादी तीन दिवसांपूर्वी हरियाणा पोलिसांनी कार्यवाही करत ताब्यात घेतले आहेत. हरियाणातील कर्नाल चेक पोस्टवर मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन नांदेड मध्ये येत असलेल्या चार अतिरेक्यांना पकडण्यात आले असून त्यांच्या कडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली होती. सदर अतिरेक्यांकडून या घातक स्फोटकांच्या आधारे नांदेड व तेलंगणातील आदिलाबाद येथे मोठा घातपात करण्याचा कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

नांदेड जिल्ह्यात हाय अलर्ट - दरम्यान या चार जणांचा म्होरक्या कुख्यात गुंड हरविंदरसिंग रिंदा असल्याचे स्पष्ट झाल्याने यात नांदेडचे नाव समोर आले आहे. त्यानंतर नांदेड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून पालिसांनी ऍक्शन मोड मध्ये येत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. रिंदा याच्या शेतात व जामिनावर बाहेर आलेल्या त्याच्या साथीदारांच्या घरी धाडसत्र सुरू केले आहे. त्यावेळी अनेक ठिकाणी शस्त्रसाठाही सापडला आहे.

मार्च महिन्यात होते नांदेडला मुक्कामी - दरम्यान रिंदाचे साथीदार गुरूप्रित, अमनदीप, परमिंदर आणि भपिंदर हे नांदेडकडे वाहनातून येत असताना कर्नाल पोलिसांनी त्यांना पकडले होते. त्यातच पकडलेले हे आरोपी मार्च महिन्यात नांदेडमध्ये चार दिवस मुक्कामी असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. सदरील दहशतवादी यांनी नांदेड, बिदर, हैद्राबाद आणि गोवा या भागातही रेकी केल्याची माहिती पुढे येत आहे. यास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा दुजोरा दिला आहे. सदरील अतेरिकी दरम्यानच्या काळात कुणा-कुणाला भेटले. त्यांचा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा काही संबंध आहे का? याबाबतीतही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Last Updated : May 10, 2022, 1:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.